
मंचरला बालचमुंची वृक्षदिंडी : श्रमदानातून ३०० रोपांची लागवड
मंचर - येथील न्यू ऑक्सफर्ड इंटरनॅशनल स्कूल व राम कृष्ण हरी ग्रुप यांच्या वतीने वृक्षदिंडी काढून ३०० रोपांची लागवड करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी “वृक्ष लावा, वृक्ष जगवा”, “एक मुल, एक झाड” अशा घोषणा दिल्या.
न्यू ऑक्सफर्ड इंटरनॅशनल स्कूलच्या संस्थापक अध्यक्षा स्वाती मुळे, रामकृष्ण हरी ग्रुपचे अध्यक्ष बाळासाहेब विठ्ठलराव बाणखेले, भारतीय जनता पक्ष किसान मोर्चाचे अध्यक्ष संजय थोरात यांच्या हस्ते वृक्षदिंडीचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी सुनंदा बाळासाहेब बाणखेले,मंदा रंगनाथ थोरात, अरुण बाणखेले, रंगनाथ थोरात, गोकुळ बाणखेले, राम थोरात भक्ते, निलेश ननावरे यांच्यासह बालचमू सहभागी झाले होते.
मंचर व अवसरी खुर्द गावच्या सरहद्दीवर असलेल्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय रस्ता व ईश्वर बाबा मंदिर परिसरात ३०० ठिकाणी श्रमदानातून खोदकाम केलेल्या खड्ड्यांमध्ये वृक्ष लागवड करण्यात आली. संवर्धनासाठी खते व पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. वृक्ष संवर्धन व संरक्षणाची जबाबदारी न्यू ऑक्सफर्ड स्कूल व राम कृष्ण हरी ग्रुपने स्वीकारली आहे.” असे बाळासाहेब बाणखेले यांनी सांगितले.
Web Title: Childrens Vriksha Dindi At Manchar Planting Of 300 Saplings Through Laborsaving
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..