चिंचवडमध्ये सराईत गुन्हेगाराची दहशत

चिंचवडमध्ये सराईत गुन्हेगाराची दहशत
Published on

चिंचवड, ता.१५ ः चिंचवडमधील इंदिरानगर भोईरनगर परिसरात एका सराईत गुन्हेगाराच्या दहशतीमुळे मुली, महिला,ज्येष्ठ नागरिक व परिसरातील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. संबंधित व्यक्तीविरोधात वारंवार तक्रारी करूनही चिंचवड पोलिसांकडून प्रभावी कारवाई होत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
सुमीत शिवाजी भोसले (वय २३, रा. इंदिरानगर,चिंचवड) असे त्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. नागरिकांच्या म्हणण्यानुसार, संबंधित व्यक्तीवर नळाचे मीटर, वाहनांमधील पेट्रोल, बॅटऱ्या तसेच घरगुती साहित्य चोरीचे आरोप यापूर्वीही झाले आहेत. धारदार शस्त्र बाळगून फिरणे, नागरिकांना धमकावणे, भरधाव दुचाकी चालवून दहशत निर्माण करणे तसेच महिलांशी अशोभनीय वर्तन केल्याच्या तक्रारीही करण्यात आल्या आहेत.

एका अल्पवयीन मुलाच्या मित्राला जबरदस्तीने सिगारेट ओढण्यास भाग पाडत असल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली असता मी तेथे मदतीसाठी गेलो. त्यावेळी आरोपीने हातात चाकू, फुटलेली मद्याची बाटली घेऊन दहशत निर्माण केली. याप्रकरणी तातडीने चिंचवड पोलिस ठाण्यात तक्रार दिली. मात्र, काही वेळातच आरोपी पुन्हा परिसरात येऊन धुडगूस घातला.
- दिलीप लाड, नागरिक


संबंधित आरोपीविरोधात रात्री अदखलपात्र गुन्हा दाखल झाला असल्यास नियमानुसार आवश्यक ती कारवाई केली जाईल. काही तक्रारी किंवा पुरावे असल्यास नागरिकांनी प्रत्यक्ष भेटून माहिती द्यावी. प्रत्येक तक्रारीची गांभीर्याने दखल घेऊन योग्य ते निवारण केले जाईल.
- दत्तात्रेय चासकर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, चिंचवड पोलिस ठाणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com