Spiritual Education : १९ राज्यांतील १६० स्पर्धकांचा सहभाग; चिन्मय मिशनच्या राष्ट्रीय गीता पठण स्पर्धेत विद्यार्थ्यांनी पटकावली विजेतेपदे

National Bhagavad Gita Chanting Competition 2026 : चिन्मय मिशनच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त कोळवण येथील चिन्मय विभूतीमध्ये राष्ट्रीय गीता पठण स्पर्धेची सांगता झाली. देशातील १९ राज्यांमधील १६० स्पर्धक सहभागी झाले असून सहा वयोगटांतील विजेत्यांचा गौरव करण्यात आला.
National Bhagavad Gita Chanting Competition 2026

National Bhagavad Gita Chanting Competition 2026

sakal

Updated on: 

कोळवण : वेदांताच्या शाश्वत ज्ञानाच्या माध्यमातून आत्मपरिवर्तन आणि आध्यात्मिक जागृतीसाठी समर्पित असलेल्या जागतिक स्तरावरील चिन्मय मिशनतर्फे आयोजित राष्ट्रीय गीता पठण स्पर्धा (CGCC) २०२६ ची सांगता २२ नोव्हेंबर रोजी कोळवण येथील चिन्मय विभूती येथे झाली.

पूज्य गुरुदेव स्वामी चिन्मयानंद यांनी १९५१ मध्ये स्थापन केलेले चिन्मय मिशन यावर्षी आपल्या ७५ वर्षांच्या वाटचालीचा उत्सव साजरा करत आहे. आध्यात्मिक शिक्षण, ज्ञानप्रसार आणि निःस्वार्थ सेवा यांच्या माध्यमातून वेदांताचे ज्ञान सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याची मिशनची बांधिलकी आजही कायम आहे.

२१ आणि २२ नोव्हेंबर रोजी आयोजित दोन दिवसीय राष्ट्रीय अंतिम फेरीमध्ये देशभरातील तरुण स्पर्धक एकत्र आले. भावी पिढ्यांमध्ये भगवद्गीतेचे चिरंतन महत्त्व अधोरेखित करणारा हा उपक्रम ठरला.

Loading content, please wait...