‘चिंटू’ होणार रविवारी ३० वर्षांचा | Chintoo | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chintoo
‘चिंटू’ होणार रविवारी ३० वर्षांचा

‘चिंटू’ होणार रविवारी ३० वर्षांचा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - ‘चिंटू’ या हास्यचित्र मालिकेतील चिंटूला येत्या रविवारी (ता. २१) ३० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त स्नॉवेल प्रस्तूत ‘चिंटू@३०’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांतर्गत लहानग्यांपासून आबालवृद्धांपर्यंत सर्वांसाठी विविध उपक्रम आयोजित केल्याची माहिती स्नॉवेलचे समीर धामणगावकर आणि चिंटूकार चारुहास पंडित यांनी पत्रकार परिषदेत दिली.

धामणगावकर म्हणाले, ‘चिंटू या हास्यचित्र मालिकेच्या सातत्याने मराठी मनाला भुरळ घातली आहे. चिंटूची सुरुवात दैनिक सकाळ मधून झाली. आज तो समाज माध्यमातूनही लाखो लोकांपर्यंत पोचला आहे. तर चिंटूच्या त्रीदशकपूर्ती निमित्त स्नॉवेलच्या माध्यमातून चिंटूचा खट्याळ, खोडकरपणा आता लोकांना ऑडिओ स्टोरीच्या स्वरूपातही अनुभवायला मिळणार आहे.’

हेही वाचा: काळजी वाढली ! पुणे जिल्ह्यात सक्रीय रुग्ण संख्येत वाढ

हा कार्यक्रम येत्या रविवारी (ता. २१) कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे सकाळी आठ ते रात्री नऊ यावेळेत होणार आहे. यामध्ये मुख्य कार्यक्रमासह चिंटूचा बर्थडे सेलिब्रेशन केले जाणार आहे. या व्यतिरिक्त चित्रकला स्पर्धा, चिंटूच्या हास्यचित्राचे प्रदर्शन, चिंटूच्या गमतीजमती आणि कार्टून कशी काढावीत याचे प्रात्यक्षिके दाखविणे अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याचे पंडित यांनी सांगितले.

loading image
go to top