पुणेकरांनो, लस घेताय? मग, थेट चितळेंकडून मिळणार बाकरवडी भेट 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 8 April 2021

आता लसीकरणांचे प्रमाण वाढावे यासाठी पुण्याच्या चितळेबंधूनी देखील पुढाकार घेतली आहे. आता पुण्यात कोरोना प्रतिबंधक लस घेणाऱ्या नागरिकांना चितळें बंधूची खास बाकरवडी भेट मिळणार आहे. 

पुणे :  पुणेकरांनो, तुम्ही कोरोनाची लस घेणार आहात का? मग तुम्हाला पुण्याची प्रसिद्ध चितळे बंधूंची बाकरवडी भेट मिळणार आहे. मस्करी नाही, हे खरेच आहे. पुण्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांचा आकडा वाढतोय. त्यामुळे अधिकाधिक लसीकरण होणे आवश्यक आहे. त्यामुळे शहरात जास्तीत जास्त लसीकरण व्हावे यासाठी भन्नाट आयडिया वापरली. चितळे बंधूंकडून कोरोना प्रतिबंधक लस घेणाऱ्या नागरिकांना चक्क बाकरवडीचे पाकीट देणार आहेत. 

पुण्याता कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असून कोरोना बाधितांची संख्या देखील वाढत आहे. त्यामुळे जास्ती जास्त लसीकरण होणे आणि लसीकरणाचा वेग वाढवणे अत्यंत महत्वाचे आहे. पुणे महापालिका प्रशासना त्यासाठी वेळोवेळी आवाहन करतच आहे. पुणे शहर आणि जिल्ह्यात मिळून दिवसाला1 लाख लोकांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट समोर ठेवण्यात आले आहे. त्यासाठी सर्व स्तरातून लसीकरणासाठी प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न होत आहे. पण आता लसीकरणांचे प्रमाण वाढावे यासाठी पुण्याच्या चितळेबंधूनी देखील पुढाकार घेतली आहे. आता पुण्यात कोरोना प्रतिबंधक लस घेणाऱ्या नागरिकांना चितळें बंधूची खास बाकरवडी भेट मिळणार आहे. 

पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

दिवसभरातील मुख्य बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

पुणे प्लॅटफॉर्म फॉर कोविड रिस्पॉन्सच्या माध्यमातून चितळे बंधू मिठाईवाले यांनी हा उपक्रम राबविला आहे. या अंतर्गत आठवड्यात साधारण 15 हजार बाकरवडीची पाकिटे वाटप होणार आहे. त्यासाठी कोणतेही लसीकरण केंद्र निश्चित करण्यात आले नाही."आम्ही बाकरवडीची पाकिटे कोणत्याही एका केंद्रावर देणार नसून वेगवेगळ्या केंद्रांवर स्वयंसेवांमार्फत पाकिटे देणार आहेत. केंद्र जाहीर केल्यास गर्दी होऊ शकते." अशी माहिती चितळे उद्योग समूहाचे साथीदार संजय चितळे यांनी दिली आहे.  दरम्यान चितळे बंधूच्या या उपक्रमाला पुणेकर उस्फुर्तपणे प्रतिसाद देतील असे दिसते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chitale bandhu Gifting Bakarwadi to people After corona Vaccination