रुपाली चाकणकर ऍडमिट झाल्या अन् चित्रा वाघ यांनी केलं ट्विट, म्हणाल्या...

Chitra Wagh tweeted about Rupali admitting Chakankar in hospital
Chitra Wagh tweeted about Rupali admitting Chakankar in hospital

पुणे : भारतीय जनता पक्षाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रदेश महिला अध्यक्षा रुपाली चाकणकर या लवकर बऱया होवोत, अशा आशयाचे ट्विट करीत, राजकारणात परस्पर संघर्ष असला तरी, त्या पलीकडे कधीकाळी जोपासलेली मैत्रीही असते, हे दाखवून दिले आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

वाघ या एक वर्षांपूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून भारतीय जनता पक्षात गेल्या आहेत. तत्पूर्वी त्या राष्ट्रवादीच्या प्रदेश महिला अध्यक्षा होत्या. त्या वेळी चाकणकर या पुणे शहरातील पक्षाच्या महिला अध्यक्षा होत्या. दोघींमध्ये त्यावेळी चांगलेच ट्यूनिंग होते. मात्र, वाघ यांचा भाजप प्रवेश झाल्यावर चाकणकर यांची राष्ट्रवादीने महिला प्रदेश अध्यक्षपदावर नियुक्ती केली. त्यानंतर वाघ आणि चाकणकर यांच्यात राजकीय संघर्ष सुरू झाला. तो इतका टोकाला गेला की, त्यांनी परस्परांना बावळट, बिनडोक अशी विशेषणेही वापरली होती. 

वाघ आणि चाकण या दोघीही सोशल मीडियावर अॅक्टिव्ह आहेत. त्यांना फॉलो करणाऱयांचीही संख्या मोठी आहे. त्यामुळे दोघींमधील वाद, संघर्ष हा नेटिझन्ससाठी औत्सुक्याचा विषय झाला होता. हिंगणघाट येथे प्राध्यापक युवतीला एका माथेफिरूने जिवंत जाळले होते. त्यावेळच्या कायदा सुव्यवस्थेवरून वाघ यांनी महाविकास आघाडी सरकाराला धारेवर धरले होते तर, चाकणकर यांनी राज्य सरकारचा, गृहमंत्री अनिल देशमुख यांची बाजू लावून धरली होती.

 कोरोनाच्या लढ्यात 'फर्ग्युसन'ही झालं सहभागी; होस्टेलमध्ये उभारणार कोविड केअर सेंटर!

चाकणकर यांना चार दिवसांपूर्वी सिंहगड रस्त्यावरील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु, प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्यांना आता रुबी हॉलमध्ये अॅडमिट करण्यात आले आहे. त्यांना डेंगी झाल्याचे सांगण्यात येत आहे. चाकणकर यांच्या प्रकृतीला कोणताही धोका नाही. त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत आहे, त्यांच्या कुटुंबियांनी स्पष्ट केले. चाकणकर बऱया होवोत, अशा आशयाचे ट्विट दोघींच्या फोटोसह वाघ यांनी केल्यावर, त्याला प्रतिसादही मोठा मिळाला आहे. तब्बल 2400 हून अधिक लोकांनी त्याला लाईक केले असून रिट्विटही मोठ्या प्रमाणात झाले आहे. दोघींच्या कधीकाळच्या मैत्रीबद्दलही अनेक नेटकऱयांनी चांगल्या कॉमेंटसही केल्या आहेत.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com