esakal | भोसरी एमआयडीसीमध्ये क्लोरीन गळती
sakal

बोलून बातमी शोधा

क्लोरीन गळती

भोसरी एमआयडीसीमध्ये क्लोरीन गळती

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

भोसरी : भोसरी औद्योगिक वसाहतीच्या पेठ क्रमांक दहामधील एका कंपनीत बुधवारी दुपारी दीडच्या सुमारास क्लोरीन वायू गळती झाली. वल्लभनगरमधील मुख्य अग्निशमन केंद्र व भोसरीतील उपअग्निशमन केंद्रातील जवानांनी ती थांबवली. मात्र या प्रयत्नात तीन जवानांना वायूमुळे श्वसनाचा किरकोळ त्रास झाला. दवाखान्यात प्राथमिक उपचारानंतर त्यांना घरी सोडले.

हेही वाचा: राज्यात यंदा विक्रमी ऊस गाळप होणार

वल्लभनगरमधील मुख्य अग्निशमन केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, प्लॅाट क्रमांक २१२ सत्यसाई एंटरप्रायजेसच्या सत्यसाई अॅक्वा प्युरा कंपनीमध्ये ही गळती झाली. ती रोखण्यासाठी वल्लभनगरमधील मुख्य अग्निशमन केंद्रातील मुख्य अग्निशमन अधिकारी किरण गावडे, उपअधिकारी ऋषीकांत चिपाडे व जवान आदींसह भोसरी अग्निशमन केंद्रातील जवान पोहोचले. त्यांनी ती थांबवली. मात्र या प्रयत्नात तीन जवानांना घशाला कोरड पडण्याचा किरकोळ त्रास होऊ लागला. त्यांना दवाखान्यातील प्राथमिक उपचारानंतर घरी सोडण्यात आले.

loading image
go to top