Traffic Diversions in Camp Area Ahead of Christmas
sakal
पुणे, ता. २३ : नाताळ सणाच्या पार्श्वभूमीवर लष्कर भागातील महात्मा गांधी रस्त्यावर नागरिकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी टाळण्यासाठी लष्कर परिसरात २४ आणि २५ डिसेंबर रोजी सायंकाळी सात वाजल्यापासून तात्पुरता वाहतूक बदल करण्यात येणार आहे. वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त हिंमत जाधव यांनी हा आदेश काढला आहे. त्यानुसार वाय जंक्शनवरून एम. जी. रस्त्याकडे येणारी वाहतूक १५ ऑगस्ट चौक येथे बंद करून, ती कुरेशी मशीद आणि सुजाता मस्तानी चौकाकडे वळविण्यात येणार आहे.