esakal | इथं पैसे घेतले जात नाहीत; पुण्यात सरकारी कार्यालयावर परीपत्रक काढण्याची नामुष्की
sakal

बोलून बातमी शोधा

Circular drawn to the office of the Joint Director of Higher Education viral

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या पुणे, नगर, नाशिक जिल्ह्यातील कला, वाणिज्य व विज्ञान शाखेच्या महाविद्यालयांचा कारभार सह संचालक कार्यालयातून चालतो. महाविद्यालयांच्या प्रलंबित कामकाज पाठपुरावा केला तरी उत्तर मिळत नाही अशी स्थिती असल्याने याविरोधात उच्च शिक्षण विभागाचे संचालक डॉ. धनराज माने यांच्याकडे तक्रार ही करण्यात आली होती.

इथं पैसे घेतले जात नाहीत; पुण्यात सरकारी कार्यालयावर परीपत्रक काढण्याची नामुष्की

sakal_logo
By
ब्रिजमोहन पाटील

पुणे : शासकीय कार्यालयात फाईल हलायची असेल तर त्यावर नोटांचे वजन वजन ठेवावेच लागते. तरच फाईल पुढे सरकते, अन्यथा महिनोंमहिने चकरा माराव्या लागतात. अशीच गत पुण्यातील उच्च शिक्षण सह संचालक कार्यालयाची झाल्याने त्याविरोधात तक्रारी गेल्याने "या कार्यालयात कोणत्याही कामासाठी पैसे द्यावे लागत नाहीत" असे परिपत्रकच काढण्याची नामुष्की ओढावली आहे. 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या पुणे, नगर, नाशिक जिल्ह्यातील कला, वाणिज्य व विज्ञान शाखेच्या महाविद्यालयांचा कारभार सह संचालक कार्यालयातून चालतो. महाविद्यालयांच्या प्रलंबित कामकाज पाठपुरावा केला तरी उत्तर मिळत नाही अशी स्थिती असल्याने याविरोधात उच्च शिक्षण विभागाचे संचालक डॉ. धनराज माने यांच्याकडे तक्रार ही करण्यात आली होती. तसेच काही जणांना गुप्तपणे भेटून कामे केली जात आहेत, असा आरोप करत कार्यालयातील भ्रष्टाचाराबद्दल तक्रार केल्याने या कार्यालयातील कामकाज संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

यामुळे सह संचालक डॉ. मोहन खताळ यांना खुलासा करण्याची वेळ आली आहे. 'या कार्यालयामध्ये कोणत्याही कामासाठी पैसे लागत नाहीत. कोणत्याही कामासाठी महाविद्यालयीन अधिकारी किंवा कर्मचारी पैशाची मागणी करत असेल तर याविरोधात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करावी' असे परिपत्रक काढावे लागले आहे.
याबद्दल डॉ. मोहन खताळे म्हणाले, "सह संचालक कार्यालयात शासकीय कामासाठी पैसे मागितले जात आहेत, अशा तक्रारी आल्या होत्या. त्यामुळे हे प्रकार थांबवावे यासाठी परिपत्रक काढले आहे."

"सहसंचालक कार्यालयात प्राध्यापकांच्या वेतन निश्चितीसाठीसह अनेक कामे होत नाहीत. त्यातून भ्रष्टाचार होत आहे. फाईल आल्यानंतर एका महिन्यात काम झाले पाहिजे, उशीर झाला की भ्रष्टाचार सुरू होतो. त्यामुळे याविरोधात तक्रार केली होती. आता परिपत्रक काढल्यानंतर कामात सुधारणा झाली पाहिजे."
- डॉ. के. ल. गिरमकर, अध्यक्ष, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व महाविद्यालय शिक्षक संघटना. 

पुण्यात फिल्मीस्टाईल थरार; खूनाचा प्रयत्न करणाऱ्याचा पोलिसांनी केला पाठलाग आणि...

ही कामे प्रलंबित
कॅस' अंतर्गत वेतन निश्‍चितीचे प्रकरण, प्राध्यापक पदाची स्थान निश्‍चिती, गतवर्षी नियुक्‍त झालेल्या प्राध्यापकांची वेतन निश्‍चिती व वेतन सुरू करणे, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची पीएफ रक्‍कम न मिळणे, अर्धवेळ शिक्षकांना वेतन आयोग निश्‍चित होणे, यासंदर्भातील फाईल अनेक महिन्यांपासून प्रलंबित आहेत.

कार्यक्षेत्रातील महाविद्यालये - ३२६

जिल्हानिहाय महाविद्यालय संख्या
पुणे -  १७७
नगर - ८०
नाशिक - ८८
अनुदानीत महाविद्यालये - १६७ 
अनुदानीत महाविद्यालयातील प्राध्यापक संख्या -४५०० 

loading image
go to top