कात्रज परिसरात विजेच्या लपंडावाने नागरिक त्रस्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कात्रज परिसरात विजेच्या लपंडावाने नागरिक त्रस्त

पुणे : कात्रज परिसरात विजेच्या लपंडावाने नागरिक त्रस्त

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कात्रज : मागील काही दिवसांपासून कात्रज परिसरात विजेचा लपंडाव सुरु आहे. दिवसांतून किमान सात ते आठ वेळा विज ब्रेक होत असते. त्यातच सोमवारपासून विजपुरवठा कमी पावरने होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे त्या कमी पावरच्या विजेवर लिफ्ट आणि पाण्याची मोटार चालत नसल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. काहीवेळा वीज गेल्यास किमान तासभर न आल्याच्या घटनाही घडत आहेत. या खंडित वीजपुरवठ्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असल्याने महावितरण विभागाने तातडीने लक्ष घालून उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.

वीज ब्रेक होत असल्याने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काहीजण आणखीही वर्क फ्रॉम होम करत आहेत. तसेच, ऑनलाईन शिक्षण घेण्याऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही मोठी समस्या बनली आहे. त्याचबरोबर लघु उद्योजकांच्या व्यवसायावर याचा परिणाम होत आहे. वीज गेल्यास मोठ्या इमारतीत लिफ्टचा गंभीर प्रश्न उद्भवत असून ज्येष्ठ नागरिकांना जिन्याने चढ-उतार करावी लागत असल्याचे समोर आले आहे. रात्रीच्यावेळीही वीज जाते, अशावेळी वीज गेल्यावर गोंधळ निर्माण होऊन भितीदायक परिस्थिती निर्माण होते. प्रत्येकाकडे जनरेटर किंवा इन्व्हर्टरची सुविधा नसल्यामुळे विज गेल्यास त्रास सहन करावा लागत असल्याचे विकास पाखरे यांनी सांगितले.

हेही वाचा: विधान परिषद निवडणूक : ग्राम पंचायत सदस्य झाले रिचार्ज

कात्रज-कोंढवा रोड भागामध्ये मोठमोठ्या इमारती असून वारंवार विज पुरवठा खंडीत झाल्यानंतर नागरिकांची गैरसोय होत आहे. याबाबत कात्रज येथील महावितरण विभागाशी संपर्क साधून खंडीत होणाऱ्या विज पुरवठ्याबाबत अनेक तक्रारी दिल्या. परंतु, यावर कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळत नसून या आठवड्यात तर विजपुरवठा खंडित झाल्याने मोठा त्रास वाढला असल्याचे अर्जुन निंबाळकर यांनी सांगितले.

"ट्रान्सफॉर्मरची तार तुटल्याने ही अडचण निर्माण झाली होती. परंतु, तत्काळ ही अडचण दूर करण्यात आली. तसेच, नांदेडसिटीचे एका केबलचा भार येवलेवाडीच्या केंद्रावर घेतला असल्याने कधी कधी भार सहन होत नसल्याने विजपुरवठा खंडित होत आहे. लवकरच ही अडचण सोडविण्यात येईल."

- एस. एस. भोरे, शाखा अभियंता, कात्रज विभाग

loading image
go to top