पुणे : बालेवाडीतील नागरिक रस्त्याच्या कामाने त्रस्त 

पुणे : बालेवाडीतील नागरिक रस्त्याच्या कामाने त्रस्त 
Updated on

बालेवाडी : स्मार्ट सिटीकडून गेले वर्षभर बालेवाडी येथे रस्त्याचे काम सुरू असून संथ गतीने होणाऱ्या कामामुळे  नागरिक त्रस्त झाले आहेत. त्याचप्रमाणे बालेवाडी गावठाणातील रस्त्याचे कामही अनेक महिन्यांपासून अर्धवट  स्थितीत असल्यामुळे आम्हाला चांगले रस्ते कधी मिळणार असा सवाल नागरिक करत आहेत?  तर एका ठिकाणी तर रस्त्याचे केलेले काम आत्ताच खराब झाले आहे त्यामुळे रस्त्याच्या कामाच्या दर्जाबाबत  प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. 

बाणेर-बालेवाडी भागाची स्मार्ट सिटीसाठी निवड झाली, त्यामुळे या भागातील नागरिकांना स्मार्ट सिटी मुळे आपल्याला चांगल्या सोयीसुविधा मिळतील अशी आशा वाटत होती, पण प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे या भागातील नागरिक चांगलेच त्रस्त झाले आहेत. गेले वर्षभरापासून बालेवाडी येथे स्मार्ट सिटीकडून रस्त्यांची कामे हाती घेण्यात आली आहेत. पण ती अजूनही पूर्ण न  झाल्यामुळे नागरिक चांगलेच मेटाकुटीस आले आहेत.

त्याचबरोबर स्मार्ट सिटीकडून नियोजन केलेला रस्ता हा स्मार्ट असणे गरजेचे आहे. विकास आराखड्याप्रमाणे सर्वत्र 30 मी. रुंदीचा असणे आवश्यक आहेत, पण प्रत्यक्षात मात्र बालेवाडी येथे मिटकॉन पासून सुरू झालेला रस्ता हा तीस मीटर रुंदीचा आहे आणि पुढे एस. के. पी. कॅम्पसजवळ हा रस्ता  24 मीटर रुंद बनवण्यात येतो आहे. तीस मीटर वरून 24 मीटर रुंदीचा रस्ता झाल्यामुळे या ठिकाणी रस्ता निमुळता झाला असून पदपथ रस्त्यावरच येतो आहे.

त्याचबरोबर गावठाणात जाताना महापालिकेच्या कै. बाबूराव बालवडकर शाळेजवळ काँक्रीट केलेल्या रस्त्याचे सिमेंट निघून हा रस्ता खडबडीत झाला असून या पुढचा गावठाणाकडे जाणारा  पुढचा रस्ता हा अर्धवट स्थितीतच तयार केलेला आहे. त्यामुळे आजूबाजूची वाळू  रस्त्यावर येऊन दुचाकी वाहने घसर न्याचे प्रमाण वाढले आहे. तरी नागरिकांच्या समस्या लक्षात घेऊन प्रशासनाने या रस्त्याचे काम विकास आराखड्याप्रमाणे लवकरात लवकर करण्याची मागणी या भागातील नागरिक करीत आहेत.  

बालेवाडी येथे एस. के. पी. कॅम्पस जवळ  महापालिकेकडून तुम्हाला विकास आराखड्याप्रमाणे तीस मीटर रुंदीची जागा ताब्यात न मिळाल्याने हा रस्ता रखडला आणि अजूनही 24 मीटर जागा ताब्यात मिळाल्याने आम्ही तेवढ्याच रुंदीचा रस्ता बनवू शकलो. त्याचबरोबर बालेवाडी गावठाण येथेही रस्त्यामध्ये मनपाची जुनी शाळा येत आहे. ही शाळा पाडून मगच रस्त्याचे काम पूर्ण करता येईल. रस्त्याचे काम करताना जागा ताब्यात न मिळाल्याने हा विलंब होत आहे. त्याच प्रमाणे ज्या ठिकाणी रस्ता खराब झाला आहे तो त्या कॉन्ट्रॅक्टरकडून पून्हा  करून घेण्यात येणार आहे. -अरुण गोडबोले, मुख्य अभियंता स्मार्ट सिटी 

गेल्या सहा महिन्यापासून आमच्या सोसायटी समोरील रस्त्याचे काम सुरू आहे. सोसायटीचे दोन्ही गेट बंद झाले आहेत. महिला व ज्येष्ठ नागरिकांना संध्याकाळी सात नंतर सोसायटीच्या बाहेर पडणे अशक्य झाले आहे.-अभिजित भाटघर, साई सिलिकॉन व्हॉली, बालेवाडी 

(संपादन : सागर डी. शेलार)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com