पवारसाहेबांकडून बारामतीकरांना अनोखी भेट 

sharad-pawar
sharad-pawar

बारामती (पुणे) : कोरोनाग्रस्तांना उपयुक्त असलेली रेमीडेसेव्हर ही 100 इंजेक्शन्स ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज बारामतीकरांसाठी सुपूर्द केली. 

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संजयकुमार तांबे यांच्याकडे आज त्यांनी ही इंजेक्शन्स सुपूर्द केली. बारामतीकरांच्या दृष्टीने ही इंजेक्शन्स उपयुक्त असून, ज्यांना आवश्यकता असेल, त्यांच्यासाठी या इंजेक्शन्सचा वापर करण्याची सूचना शरद पवार यांनी तांबे यांना केली. या प्रसंगी बारामतीच्या नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, गटनेते सचिन सातव, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर उपस्थित होते. 

दरम्यान, शरद पवार यांनी बारामतीतील कोरोनाच्या परिस्थितीची डॉ. तांबे यांच्यासह पदाधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. कोरोनाची स्थिती आटोक्यात राहिल, या साठी आवश्यक ती उपाययोजना करण्याच्या सूचनाही पवार यांनी या प्रसंगी दिल्या. 
 
Edited by : Nilesh Shende

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com