
पुणे : तुकडेबंदी कायद्याचा भंग करून झालेले जमीन व्यवहार पाच टक्के शुल्क भरून नियमित करण्याच्या राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाचा नागरिक मोठ्या प्रमाणावर फायदा घेत आहेत. गेल्या सहा महिन्यांत लोणी काळभोर आणि हवेली तहसील हद्दीतील नागरिकांनी याचा सर्वाधिक लाभ घेतला असल्याचे समोर आले आहे.