पुण्यातील `या` कंटेन्मेंट झोनमधील नागरिकांची होतीये उपासमार

अजित घस्ते
सोमवार, 1 जून 2020

लक्ष्मीनगर येथील शाहू वसाहत आठ दिवसांपूर्वी प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. या भागातील गरजूंना महापालिकेकडून मिळणारे किट अद्याप मिळाले नसून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.

सहकारनगर (पुणे) : लक्ष्मीनगर येथील शाहू वसाहत आठ दिवसांपूर्वी प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. या भागातील गरजूंना महापालिकेकडून मिळणारे किट अद्याप मिळाले नसून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.

पुण्यातील `या` भागात अवैध व्यावसायिक जोमात

शाहू वसाहतीच्या चारी बाजूने पत्रे मारून परिसर सिल करण्यात आला आहे. या मुळे नागरिकांना औषध व इतर खरेदीसाठी बाहेर पडता येत नाही. महापालिकेकडून प्रतिबंधित क्षेत्रातील गरजूंना धान्य किट दिले जाते. यात जीवनावश्यक वस्तूंचा समावेश असतो. मात्र, आठवडा होऊनही या भागातील गरजूंना धान्याचे किट मिळाले नाही.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

याबाबत स्थानिक फारूक शेख म्हणाले, लॉकडाउन सुरू झाल्यापासून महापालिका व नगरसेवकांनी आमच्या भागाकडे दुर्लक्ष केले आहे. महापालिकेने योग्य खबरदारी घेतली नसल्याने शाहू वसाहत रेड झोनमध्ये आला आहे. तसेच अजून मदत मिळाली नसल्याने उपासमारीची वेळ आली आहे.

पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा 

सहकारनगर-धनकवडी क्षेत्रीय कार्यालयाचे प्रभारी सहायक आयुक्त के. बी. लाखानी म्हणाले, प्रभाग ३५ मधील रेड झोन असलेल्या तळजाई वसाहत, शिवदर्शन या परिसरात धान्याचे किट वाटले आहेत. शाहू वसाहत हा आठ दिवसांपूर्वी रेडझोन परिसर घोषित केला असल्याने महापालिकेकडे ६५० किटची मागणी केली आहे. धान्य किट उपलब्ध झाल्यावर त्वरीत या भागात त्याचे वाटप केले जाईल. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The citizens of the containment zone were starving