पुणेकरांची पुन्हा दारु खरेदीसाठी झुंबड; आज दिवसभरातील दारुचा खप तर पाहा!

Wine_Shop_Pune
Wine_Shop_Pune

पुणे : शहरात पुन्हा लॉकडाऊनची घोषणा झाल्याचे कळताच मद्य विक्रीच्या दुकानांमध्ये शनिवारी (ता.११) नागरिकांची झुंबड उडाली होती. काही ठिकाणी दुकानांसमोर लांब रांगा लागल्याच्या दिसून आल्या. मद्य शौकिनांनी लॉकडाऊनचा विचार करून 'स्टॉक' करून ठेवला आहे. पुणे, पिंपरी-चिंचवडसह जिल्ह्यात शनिवारी साडेचार ते पाच लाख लिटर दारूची विक्री झाल्याचा अंदाज आहे.

कोरोनाचा संसर्ग वाढल्यामुळे मार्चअखेर आणि एप्रिल महिन्यात मद्य विक्रीची दुकाने बंद होती. सुमारे सव्वा महिन्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाने ६ मेपासून कंटेनमेंट झोन वगळता मद्य विक्री सुरू करण्याचा निर्णय  घेतला होता. त्यामुळे पुणे, पिंपरी-चिंचवड, कॅन्टोन्मेंट बोर्ड आणि ग्रामीण भागातील सुमारे 700 हून अधिक मद्य विक्रीची दुकाने पुन्हा सुरु झाली.

पुण्यात पुन्हा लॉकडाउन जाहीर झाल्यानंतर मद्य खरेदीसाठी दुकानांबाहेर ग्राहकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. मास्क, सोशल डिस्टन्सिंग आणि इतर नियमांचे पालन करून मद्य विक्रीच्या सूचना विक्रेत्यांना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार दररोज सकाळी दहा ते सायंकाळी पाच पर्यंत मद्यविक्री सुरू आहे. 

दरम्यान, जिल्हा प्रशासनाकडून पुणे, पिंपरी-चिंचवड शहर आणि जिल्ह्यात पुन्हा सोमवारी मध्यरात्रीपासून दहा दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. पुन्हा लॉकडाऊनच्या कालावधीत दारू दुकाने बंद राहतील, यामुळे अनेक ग्राहकांनी आजच 'स्टॉक' करून ठेवला.

पुणे जिल्ह्यातील मद्य विक्री (दररोजचा खप) : 
विदेशी मद्य विक्री : सुमारे एक लाख लिटर
बिअर : 70 ते 80 हजार लिटर
देशी दारू : 85 हजार लिटर

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com