नागरिकांना स्वतः करावी लागते मुस्लिम दफनभूमीची स्वच्छता

बिबवेवाडी - बागे रहमत दफनभूमी त नागरिक कुटुंबासह येऊन कबरीची स्वच्छता करतात.
बिबवेवाडी - बागे रहमत दफनभूमी त नागरिक कुटुंबासह येऊन कबरीची स्वच्छता करतात.
Updated on

बिबवेवाडी - दक्षिण उपनगरातील सॅलीसबरी पार्क येथील एकमेव जुनी असलेल्या बागे रहमत मुस्लिम दफनभूमी ची दुरवस्था झाली असून नागरिकांना स्वतः दफनभूमीत स्वच्छता करावी लागत आहे. तीन एकर जागेवर तीन टप्प्यात दफनभूमी असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यासाठी सर्वात वरच्या टप्प्यातील भागात दफन केले जाते त्याच भागाची दुरवस्था झाली असून येथे मोठ्या प्रमाणात गवत वाढलेले असून माती रस्त्यावर पसरली आहे, काही कबर खचलेल्या आहेत, झाडे उन्मळून पडलेली असून त्यामुळे दफन करण्यासाठी अडचणी येतात.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दफनविधी साठी येथे खड्डा करावा लागतो परंतु एकच कर्मचारी असल्याने दफनविधी साठी आलेल्याना खड्डा करण्यासाठी मदत करावी लागते, काही दिवसांपासून कर्मचारी आजारी असल्याने येथील सुरक्षा रक्षक खड्डा करण्याचे काम करत आहे. तीन सुरक्षा रक्षक असून तीन शिफ्ट मध्ये काम करतात. २८ मार्च रोजी मुस्लिम समाज्याच्या वतीने शब्बेरात्(जगण्याची रात) आहे त्यापूर्वी अगोदर परिसराची साफसफाई बंद असलेले लाईट पाण्याची व्यवस्था लवकर करून देण्याची मागणी नागरिकांनी अनेकवेळा केली आहे तरीसुद्धा एकच कर्मचारी असल्याने अडचणी येतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर येथील इंसाफ मित्र मंडळ व खिदमते हिंद फौंडेशनच्या माध्यमातून नागरीक दफनभूमी ची स्वच्छता करत आहे.

मन्सूर अमीन खान ( नागरीक ) : अनेक वर्षांपासून मित्र मंडळ व फौंडेशनच्या माध्यमातून नागरिक दफनभूमी ची शब्बेरात च्या पूर्वी स्वच्छता करत असून प्रशासन काही काम करत नाही.

इमाम हुन्नरे ( नागरिक ) : नागरी दफनभूमीतील कबरींवर शब्बेरात पूर्वी पांढरा रंग लावतात, स्वच्छता करतात, स्वच्छता चे काम प्रशासनाने केले पाहिजे परंतु कर्मचारी नसल्याने कामे अर्धवट राहतात नागरिकांना स्वतः कामे करावी लागतात.

गणेश सोनुने ( बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालय, सहाय्यक आयुक्त) : दफनभूमीतील स्वछतेचे काम सुरू केले असून, जिथे अस्वछता तेथील स्वच्छता त्वरित केली जाईल.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com