CM Devendra Fadnavis : ठाकरे ब्रँण्डला नागरिकांनी नाकारले आहे; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका
आता दोन भाऊ एकत्र आले आहेत. आता ठाकरे ब्रॅण्ड निवडून येणार असा प्रचार करून पतपेढीच्या निवडणुकीला विरोधकांनी राजकीय रंग दिला. मात्र लोकांनीच ठाकरे ब्रॅण्डला नाकारले.
पुणे - बेस्ट कामगारांच्या पतपेढी निवडणुकीचे राजकीयीकरण करू नये, अशी माझी सुरूवातीपासून भूमिका होती. पॅनेलमधील काही आमच्या पक्षाचे नेते निवडणूक लढवीत होते. परंतु, आम्ही कधीही याचे राजकीयीकरण होऊ दिले नाही.