मोशीतील नागरिकांना जनता कर्फ्यूबाबत घेणं-देणंच नाही

मोशीतील नागरिकांना जनता कर्फ्यूबाबत घेणं-देणंच नाही

मोशी (पुणे) : पिंपरी-चिंचवड शहरामध्ये वाढत असलेली कोरोना रुग्णांच्या संख्येला आळा बसावा म्हणून महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी रविवार व गुरुवारी 'जनता कर्फ्यू' पाळण्याचा आवाहन केले आहे. या आवाहनाला काही मोशी परिसरात हरताळ फासण्यात आला. नागरिकांनी आपले दैनंदिन व्यवहार सुरुच ठेवल्याचे दिसून आले. 

शहरासह मोशी उपनगरातही कोराना रुग्णांची संख्या वाढत आहे. या रुग्ण संख्येला आळा बसावा म्हणून आयुक्तांनी दर रविवारी आणि गुरुवारी जनता कर्फ्यूचे आवाहन केले आहे. मात्र, याकडे मोशी गावठाणसह प्राधिकरण परिसरातही नागरिकांनी जीवनावश्यक वस्तुंच्या नावाखाली आपले सर्व व्यवहार सुरू ठेवले. तसेच, या परिसरातील रस्त्यांवर बसणारे अनधिकृत भाजीविक्रेते, फळविक्रेते, किराणा दुकाने सुरुच होती. यामधील काही विक्रेत्यांनी मास्कही काळजीपूर्वक लावलेले नव्हते. त्यातच काही नागरिकही ही मला काय होतंय, या अति आत्मविश्वासाने सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करता मोठ्या प्रमाणावर गर्दी करताना दिसून येत होते. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरम्यान, नागरिकांनी पूर्वीप्रमाणेच खबरदारी घेणे आवश्यक आहे. मात्र, मोशी उपनगरातील पुणे-नाशिक महामार्ग, देहू-आळंदी बीआरटी रस्ता, स्पाईन रस्ता आदी रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर वाहतूक सुरु असल्याचे आढळून आले. मुख्य चौकातील भाजी मंडई, देहू-आळंदी बीआरटी रस्ता, मोशी-आळंदी रस्ता, जय गणेश साम्राज्य व्यापारी संकुल, स्पाईन व्यापारी संकुल आदी ठिकाणी काही व्यापाऱ्यांनी आपले व्यवसाय सुरुच ठेवले होते. त्यामुळे मोशीत जनता कर्फ्यूला संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचे निदर्शनास आले. दरम्यान, सर्व पेट्रोल पंप, अनधिकृत भाजी विक्रेते, फळ विक्रेते यांनाही बंदमध्ये सहभागी केले तरच जनता कर्फ्यूला चांगला प्रतिसाद मिळेल, असे काही नागरिकांनी सांगितले.

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com