चाकण - पुणे नाशिक महामार्गावरील तळेगाव चौकात आज विविध पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, ट्रॅफिक मुक्त चाकण कृती समितीचे सदस्य, डॉक्टर असोसिएशनचे पदाधिकारी, सदस्य, व्यावसायिक, व्यापारी, कामगार, विविध पक्षाच्या पदाधिकारी महिला, विविध गावचे सरपंच, माजी नगराध्यक्ष नगरसेवक यांनी एकत्र येऊन मार्गावरील दुभाजकावर दीड तासभर उभे राहून हातात फलक धरून सरकारला जागे करण्यासाठी निदर्शन करून घोषणा देऊन मोठे जनआंदोलन केले.