शहरी गरीबच्या कार्डसाठी नागरिकांचे हाल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Citizens line urban poor new cards renewal old cards

शहरी गरीबच्या कार्डसाठी नागरिकांचे हाल

पुणे : महापालिकेच्या शहरी गरीब योजनेचे नवे कार्ड काढणे, जुन्या कार्डचे नुतनीकरण करणे यासाठी रोज शेकडो नागरिक महापालिकेत येतात. पण या कार्यालयात कर्मचारी उपस्थित नसणे, एजंटकडून आलेल्या प्रस्तावांना प्राधान्य देणे यामुळे नागरिकांचे हाल होत आहे. भर उन्हात त्यांना रांगेत थांबावे लागत आहे.

पुणे महापालिकेतर्फे अल्प उत्पन्न गटातील नागरिकांना शहरी गरीब योजनेच्या अंतर्गत दरवर्षी उपचारासाठी दोन लाख रुपयांची मदत केली जाते. त्यासाठी उत्पन्नाचा दाखला, रहिवासी प्रमाणपत्र, मिळकतकराची पावती, रेशन कार्ड यासह इतर कागदपत्रांची गरज असते. त्याआधारे शहरी गरीबचे कार्ड मिळाल्यानंतर एका वर्षासाठी दोन लाखा पर्यंतची आर्थित मदत महापालिका करते. त्याचा आधार शहरातील सुमारे १५ हजार कुटुंब याचा लाभ घेतात.

शहरी गरीब योजनेचे कार्ड काढणे, जुन्या कार्डचे नुतनीकरण करणे यासाठी नवीन इमारतीच्या तळमजल्यावर कार्यालय आहे. ज्येष्ठ नागिरक, महिलांसाठी स्वतंत्र रांग आहे. तर इतरांसाठी स्वतंत्र रांग आहे. सकाळी १०च्या सुमारास काम सुरू होते, पण सकाळी पावणे अकरा वाजून गेले तरी सर्व कर्मचारी तेथे उपस्थित नसल्याने कामकाजावर परिणाम होतो. त्यामुळे लांब रांगा लागत आहेत. तसेच या योजनेचे कार्ड काढून देण्यासाठी एजंटाकडून एकाच वेळी १०-१५ अर्ज दिले जात असल्याने त्यांचे काम होई पर्यंत इतर नागरिक एकाच जागी थांबून राहतात. वेळ का लागत आहे याची चौकशी केली असता उडवा उडवीची उत्तरे दिली जात आहेत.

‘‘शहरी गरीब योजनेचे कार्ड काढण्यासाठी नागरिकांना चांगल्या सुविधा देण्यात येतील. एजंटामार्फत स्विकारले जाणारे अर्ज बंद केले जाणार असून, संबंधित कुटुंबातील व्यक्ती या कामासाठी उपस्थित असणे आवश्‍य आहे. कर्मचारी उपस्थित राहत नसतील तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल. तसेच अधिक मनुष्यबळ देण्यात येईल.’’

- रविंद्र बिनवडे, अतिरिक्त आयुक्त, महापालिका

Web Title: Citizens Line Urban Poor New Cards Renewal Old Cards Pune Munciple Corporation

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top