esakal | आनंदाची बातमी : 'तीन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर आम्ही निघालो, आमच्या गावा'
sakal

बोलून बातमी शोधा

ud.jpg

संत नामदेव महाराजांच्या काळापासून पंजाब राज्य महाराष्ट्राच्या संस्कृतीशी जोडले गेले आहे. या नात्याची जपणूक करीत पंजाबमध्ये व्यवसाय, नोकरी करणाऱ्या मराठी जनांना आज पंजाब सरकारने निरोप दिला आणि तीन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर बाराशे जण रेल्वेने महाराष्ट्राच्या दिशेने रवाना झाले.

आनंदाची बातमी : 'तीन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर आम्ही निघालो, आमच्या गावा'

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे : संत नामदेव महाराजांच्या काळापासून पंजाब राज्य महाराष्ट्राच्या संस्कृतीशी जोडले गेले आहे. या नात्याची जपणूक करीत पंजाबमध्ये व्यवसाय, नोकरी करणाऱ्या मराठी जनांना आज पंजाब सरकारने निरोप दिला आणि तीन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर बाराशे जण रेल्वेने महाराष्ट्राच्या दिशेने रवाना झाले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

देशभरात लॉकडाऊन जाहीर झाल्यामुळे गेले तीन महिने हे लोक पंजाबमध्ये अडकून पडले होते. यातील बहुतांश जण सोने वितळण्याचा (गलाई) व्यवसाय करतात. त्यांच्याकडे मराठी कामगारही आहेत. तसेच काही जण नोकरीनिमित्त तेथे वास्तव्यास आहेत. तीन महिन्यांपासून सर्व व्यवसाय बंद असल्याने तसेच राज्यबंदी असल्याने त्यांना राज्यात परतणे मुश्कील झाले होते. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

अमृतसर येथील सहायक पोलिस महानिरीक्षक डॉ. केतन पाटील यांना केंद्र आणि पंजाब सरकारकडे पाठपुरावा केला होता. त्याला यश आले आणि आज दुपारी दोन वाजता या सर्वांचा एका रेल्वेने महाराष्ट्र दिशेने प्रवास सुरू झाला आहे. अमृतसरचे जिल्हाधिकारी सरदार शिवदुलारसिंग धिल्लन, तेथील महानगरपालिकेच्या आयुक्त कोमल मित्तल सहायक पोलिस महानिरीक्षक डॉ. केतन पाटील यांनी रेल्वेला हिरवा झेंडा दाखविला. प्रवास सुरू होण्यापूर्वी मराठी जनांनी सर्व प्रशासकीय, रेल्वे आणि पोलिस अधिकाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. अमृतसरहून चाळीस तासांच्या प्रवासानंतर ही रेल्वे महाराष्ट्रात दाखल होईल. 

सुरवातीला नगर, पुणे, सातारा असा प्रवास करीत ही रेल्वे सांगलीपर्यंत पोहोचल. तेथून प्रत्येकजण आपापल्या गावाच्या दिशेने प्रवास सुरू करील. रेल्वेने येणारे बाराशे लोक हे महाराष्ट्रातील दहा जिल्ह्यांमधील आहेत. तीन महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर ते त्यांच्या कुटुंबाजवळ पोचणार आहेत.
अमृतसरमधील मराठी व्यावसायिक संदीप पाटील म्हणाले, "रेल्वेचा प्रवास सुरवात होण्यापूर्वी डब्यांचे निर्जंतुकीकरण करण्यात आले. प्रवाशांसाठी जेवण, मास्क यांची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रवासादरम्यान रेल्वेतर्फे दिल्लीसह अन्य ठिकाणी डब्यातच जेवण देण्यात येणार आहेत." 

मूळचे सातारा जिल्ह्यातील पाचवडचे असलेले संजय काशीद म्हणाले, "व्यवसाय बंद असल्याने आर्थिक नुकसान झाले आहेच; पण लॉकडाऊनमुळे गावी देखील जाता येत नव्हते. परंतु तीन महिन्यांनंतर गावी जाणार आहोत, याचा खूप आनंद आहे.

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुण्यानेच पंजाबात नेले- डॉ. केतन पाटील हे मूळचे महाराष्ट्रीय आहेत. त्यांचे मूळगाव धुळे. पण बारावीनंतर शिक्षणासाठी पुण्यात आले. पिंपरी चिंचवड येथे वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले. केंद्रीय लोकसेवा आयोगाची तयारी आणि अभ्यास त्यांनी पुण्यातच केला. दहा वर्षे ते पुण्यात वास्तव्यास होते. 2010 मध्ये यूपीएससी परीक्षेत यशस्वी होऊन पंजाब पोलिस दलात रूजू झाले.

loading image