esakal | विजेच्या लपंडावाने वडगावशेरीतील नागरिक हैराण
sakal

बोलून बातमी शोधा

विजेच्या लपंडावाने वडगावशेरीतील नागरिक हैराण

विजेच्या लपंडावाने वडगावशेरीतील नागरिक हैराण

sakal_logo
By
सुषमा पाटील.

रामवाडी: वडगावशेरी येथील मोझेसवाडी येथे दोन आठवड्यांपासून विजेच्या लपंडावने नागरिक त्रस्त झाले आहे. सदर ठिकाणचा वीज पुरवठा लवकरात लवकर सुरळीत करावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. ऐन परीक्षेचा काळ सुरू असल्याचे शाळा, महाविद्यालय विद्यार्थीची ऑनलाईन परीक्षा सुरू आहे. काही विद्यार्थ्यांचे ऑनलाईन लेक्चर सुरू असतात, अशा वेळी वीज खंडित झाल्याने त्यांच्या अभ्यासात अडथळा निर्माण होत आहे. वर्षभरापासुन टाळेबंदी असल्याने अनेक नोकरदार वर्गांचे घरातूनच वर्क फ्रॉम होम सुरू आहे. अचानक वीज पुरवठा वारंवार खंडित झाल्याने इंटरनेट नेटवर्किंग मध्ये समस्या निर्माण होऊन कामे वेळेवर होत नाही.

हेही वाचा: जावयाने सासूसोबतच मांडला संसार; बिनसल्यावर उचललं टोकाचं पाऊल

त्यामुळे कार्यालयातील वरिष्ठांचा रोष नोकरदार वर्गाना पत्करावा लागत आहे. लघु व्यावसायिकांना फटका बसत आहे. दोन आठवड्या पासुन मोझेस वाडी, टेम्पो चौक, वडगावशेरी गावठाण येथे ऐन उन्हाळ्यात विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने महावितरण विभागाने सदर ठिकाणचा वीज पुरवठा सुरळीत सुरू करावा अशी मागणी नागरिकां कडून केली जात आहे.

सदर ठिकाणी दोन वेळा तार तुटली गेली होती तर एक वेळा केबल मध्ये बिघाड निर्माण झाला होता . सध्या कामे तातडीने पूर्ण करून वीज पुरवठा सुरळीत केला जाईल.

- दिलीप मदने, कार्यकारी अभियंता, महावितरण विभाग

loading image