esakal | जावयाने सासूसोबतच मांडला संसार; बिनसल्यावर उचललं टोकाचं पाऊल
sakal

बोलून बातमी शोधा

Sun in law killed his mother in law at Aundh Pune

जावयाने सासूसोबतच मांडला संसार; बिनसल्यावर उचललं टोकाचं पाऊल

sakal_logo
By
नितिन बिबवे

बिबवेवाडी : प्रेमप्रकरणातून जावयाने सासूचा गळा आवळून खून केल्याची घटना बिबवेवाडी येथील शेळकेवस्तीत शनिवारी सकाळी घडली, पोलिसांनी जावयाला अटक केली आहे. याप्रकरणी मौलाली मंजलापूरे वय (31, रा. मार्केटयार्ड) यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ,असिफ दस्तगिर आत्तार (वय 26 रा. शेळकेवस्ती बिबवेवाडी, मूळगाव गज्जवरवाडी ता. हुक्केरी,जिल्हा बेळगाव, कर्नाटक) असे अटक केलेल्याचे नाव आहे, या घटनेत अनारकली महंमद तेरणे (वय 45 रा.शेळकेवस्ती बिबवेवाडी, मूळगाव गज्जवरवाडी, ता, हुक्केरी, जिल्हा बेळगाव, कर्नाटक) हिचा खून झाला आहे.

सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश उसगावकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, असिफ याचे अनारकली यांच्या मुलीसोबत लग्न झाले होते. त्यानंतर ते एकत्र राहत असताना असिफचे सासू अनारकली यांच्यासोबत प्रेमसंबंध निर्माण झाले. असिफने त्याच्या अल्पवयीन मेव्हणीसह सासूला बिबवेवाडीत आणून शेळकेवस्तीत भाड्याने घर घेऊन गेल्या आठ महिन्यापासून पतिपत्नी प्रमाणे राहत होते. त्यांच्यात घरगूती कारणावरून भांडणे होऊ लागली.

हेही वाचा: बारामती पोलिसांकडून दुचाकी चोरणारी टोळी जेरबंद

शनिवारी सकाळी भांडणे झाल्यावर असिफने अनारकलीचा ओढणीने गळा आवळून खून केला,त्यानंतर असिफ मार्केटयार्डातील मौलाली मंजलापूरे यांच्याकडे जाऊन अनारकली ला मारहाण केल्याचे सांगितले, मंजलापुरे यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिस ताबडतोब घटनास्थळी गेले असता अनारकलीचा खून झाल्याचे दिसले. असिफ गुलटेकडी परिसरात असून पळून जाण्याचा तयारीत असल्याची माहिती हवालदार विश्वनाथ शिंदे यांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने गुलटेकडी येथून ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर त्याने खून केल्याची कबुली दिली.

पोलिसांनी असिफला न्यायालयात हजर केले असता 6 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजेश उसगावकर करत आहे.

हेही वाचा: रुग्णांना बेड्स देण्यासाठी दोन पुणेकरांनी सुरू केलं स्टार्ट-अप

पुण्याच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

loading image