औताडेवाडी-वडाचीवाडी येथे बिबट्या दिसल्याने नागरिकांत घबराट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बिबट्या दिसल्याने नागरिकांत घबराट

औताडेवाडी-वडाचीवाडी येथे बिबट्या दिसल्याने नागरिकांत घबराट

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औताडेवाडी येथील तरुण बाहेरगावाहून गुरुवारी (दि. १८ नोव्हेंबर २०२१) औताडेवाडीकडे येत होते. त्यावेळी वडाचीवाडी-औताडेवाडी रस्त्यावर बिबट्या आणि पिल्लू आडवे जात होते. मात्र, फोटो आणि शूटिंगवर काढेपर्यंत बिबट्या आणि पिल्लू अंधारात पसार झाले, असे तुषार औताडे यांनी सांगितले. वनाधिकाऱ्यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

मागिल काही दिवसांपासून उंड्री, वडाचीवाडी, औताडेवाडी, महमंदवाडी परिसरात बिबट्या वावर असल्याचे नागरिक सांगत आहेत. मात्र, वनाधिकाऱ्यांनी पाहणी करत पायाच्या ठशाची तपासणी केली. मात्र, तो बिबट्या नसून, बिबट्यासदृश प्राणी असावा असे त्यांच्याकडून सांगण्यात आले होते.

हेही वाचा: नाशिक : सृजनशीलता उंचावत मिळवा यश

मात्र, गुरुवारी (दि. १८ नोव्हेंबर) रात्री अ़डीचच्या सुमारास हृषभ औताडे, शैलेश औताडे, तेजस औताडे, अनिकेत औताडे, हृषिकेश झांबरे, आदित्य सुर्वे यांनी बिबट्या पाहिल्याचे गावातील नागरिकांना सांगितले. त्यामुळे औताडेवाडीसह आजूबाजूच्या होळकरवाडी, शेवाळेवाडी वडाचीवाडी, उरुळी देवाची या परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले.

दरम्यान, औताडेवाडीतील तरुणांनी बिबट्या आणि पिल्लू पाहिल्याचे वनाधिकारी सपकाळे यांना सांगितले. त्यावेळी सपकाळे म्हणाले की, प्रत्यक्ष पाहणी करून योग्य ती उपाययोजना केली जाईल. त्यामुळे नागरिकांना सुरक्षिततेसाठी रात्रीच्या वेळी एकट्याने घराबाहेर पडू नये, हातामध्ये काठी ठेवावी, बॅटरी, मोबाईलचा आवाज मोठा ठेवून घराबाहेर जाताना काळजी घ्यावी, असे त्यांनी सांगितले. मागिल महिन्यामध्ये साडेसतरानळी येथे भल्या सकाळी सहाच्या सुमारास बिबट्याने कामगारावर हल्ला केला. त्यानंतर दिवसभर वनाधिकाऱ्यांनी तपास करून रात्री उशिरा बिबट्याला जेरबंद केले. त्यामुळे या परिसरात बिबट्या असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.

loading image
go to top