esakal | छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटविल्यामुळे पुण्यातील ग्रामीण भागात भाजप सरकारचा निषेध
sakal

बोलून बातमी शोधा

shiv.jpg

बेळगाव येथील मनगुत्ती गावामधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटविल्या प्रकरणाने जिल्हाभर कर्नाटक सरकारचा निषेध करण्यात आला.

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटविल्यामुळे पुण्यातील ग्रामीण भागात भाजप सरकारचा निषेध

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे : बेळगाव येथील मनगुत्ती गावामधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटविल्या प्रकरणाने जिल्हाभर कर्नाटक सरकारचा निषेध करण्यात आला. त्यात प्रामुख्याने बारामती, मंचर, आंबेगाव, लोणी काळभोर, कोरेगाव भीमा, शिरूर, मावळ, दौंड, राजगुरूनगर, मुळशी, जुन्नर आदी ठिकाणी निषेध करण्यात आला. यावेळी अनेक ठिकाणी भाजप व कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

मंचर
शिवसेनेचे उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या मार्गदर्शना खाली मंचर (ता. आंबेगाव) छत्रपती शिवाजी महाराज चौकात कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीरुप्पा यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. 

लोणी काळभोर
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा रातोरात हटवण्यात आला ही बाब अतिशय दुर्देवी व देशभरातील शिवप्रेमीत संताप आणणारी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पुन्हा आहे त्याच ठिकाणी त्वरीत उभा करण्याबरोबरच, वरील घटनेबाबत भारतीय जनता पक्षाने आपली भुमिका जाहीर करावी, अन्यथा पक्षाच्या वरीष्ठ नेत्यांना रस्त्यावर फिरु देणार नाही. असा इशारा शिवसेनेचे हवेली तालुका प्रमुख प्रशांत काळभोर यांनी लोणी काळभोर (ता. हवेली) येथे दिला.

कोरोनाग्रस्तांसाठी बनवलेल्या रुग्णालयाला आग; ०७ जणांचा मृत्यू

बारामती 
बारामती शिवसेनेच्या वतीने जिल्हाप्रमुख अँड. राजेंद्र काळे यांच्या नेतृत्वाखाली भिगवण चौकात आंदोलन केले गेले. या प्रसंगी कर्नाटक सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारत शिवसैनिकांनी आपला निषेध नोंदविला. यावेळी आदी शिवसैनिक उपस्थित होते.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

कोरेगाव भीमा
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्याच्या घटनेचा शिरुर तालुका शिवसेनेच्या वतीने कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथे कर्नाटक सरकार मुख्यमंत्र्यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळून व जोडे मारून निषेध करण्यात आला.