Pune Rains : 'निघून जा' म्हणत चंद्रकांत पाटलांवर पूरग्रस्तांचा रोष

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 सप्टेंबर 2019

टांगेवाला कॉलनी येथे नुकसानीची पाहणी करण्यासाठी गेलेल्या पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. चंद्रकात पाटील निघून जा, अशा घोषणा त्यांनी दिल्या.

पुणे : टांगेवाला कॉलनी येथे नुकसानीची पाहणी करण्यासाठी गेलेल्या पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. चंद्रकात पाटील निघून जा, अशा घोषणा त्यांनी दिल्या.

पुरामुळे वाहनाचं नुकसान झालंय? असा मिळवा 'इन्श्युरन्स क्लेम'

पुण्यात अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांची दाणादाण उडाली. सरकारी यंत्रणा मदतीसाठी उशिरा आली, नागरिकांची तक्रार आहे. या आपत्तीमध्ये नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यात पालकमंत्रीच शहरात नाही, अशी लोकांची भावना होती. नागरिकांच्या या रोषाचा आज चंद्रकात पाटील यांना सामना करावा लागला. टांगेवाला कॉलनी येथे ते पाहणी करण्यासाठी गेले असता, नागरिकांनी त्यांना निघून जाण्यास सांगितले. यादरम्यान त्यांच्या सुरक्षा रक्षकांनी धक्काबुक्की केल्याचा आरोपही नागरिकांनी केला. 

Pune Rains : होते सात, म्हणून वाचले १५०

दरम्यान, असा कोणताही प्रकार घडला नसल्याचे पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. काही लोक राजकारणासाठी असे प्रकार घडवून आणतात. पण ही वेळ राजकारणाची नाही, तर खांद्याला खांदा लावून लढण्याची आहे, असे ते म्हणाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: citizens of pune get angry on Chandrakant patil for pune flood situation