पुरंदरकरांनो, कोरोना तुमच्या घरात येईल... 

श्रीकृष्ण नेवसे 
शुक्रवार, 22 मे 2020

कोरोनामुक्त पुरंदर तालुक्‍यात रुग्ण सापडूनही नागरिक सावध झाले नाहीत.

सासवड (पुणे) : कोरोनामुक्त पुरंदर तालुक्‍यात रुग्ण सापडूनही नागरिक सावध झाले नाहीत. सासवड शहरातील बाजारपेठेत गेली तीन दिवसापासून आजही विविध व्यावसायिक व दुकानांना सवलत मिळाली. मात्र, नको एवढी गर्दी करत नागरिकांकडून सोशल डिस्टन्सिंगची वाट लावली गेली. आठवडे बाजार भरल्याचे जणू दृश्‍य दिसत होते. 

कोरोनाच्या लढाईत दौंडसाठी हा अहवाल ठरलाय..

सासवड नगरपालिकेने चौथा लॉकडाउन सुरू झाल्यानंतर तीन दिवसांपासून दिवस ठरवून देत दुकाने उघडण्याचे वेळापत्रक जाहीर केले होते. त्यातून अनेक दुकाने बरेच दिवसांनी उघडली. मात्र, सोशल डिस्टन्सिंगची ग्राहकांनी वाट लावली. सॅनेटायझर न ठेवत अनेक दुकानदारांनी दिलेल्या सवलतीला हरताळ फासला आहे. त्यामुळे पुण्याजवळील सासवड शहरातील परिस्थिती धोक्‍याच्या उंबरठ्यावर आली असल्याचे स्पष्ट जाणवत आहे.

घुंगरू तुटले रे...पोटासाठी नाचणाऱ्यांच्या नशिबी... 

चारचाकी वा दुचाकीवरून कितीही लोक बसणे, रस्त्यावर वाढलेली वाहतूक, मास्क नीट न लावणे, सॅनेटायझरचा अभाव, सूचना वारंवार सांगून थकलेले प्रशासकीय लोक, पोलिसांना त्रास, लोक सुसाट, बघ्यांची निष्कारण गर्दी व चौकात ठिय्या मारून गप्पा मारत बसणे, असेच सारे चित्र होते. त्यावर नियंत्रण नाही आल्यास दोन रुग्णांसह हे संकट जवळपास आणखी वाढण्याची भावना अनेक जाणकारांकडून आज व्यक्त झाली. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

लॉकडाउन आहे, मात्र सवलती मिळाल्याने माणसे बाहेर पडली. पुण्या- मुंबईतून आलेल्या लोकांवर नियंत्रण नसल्याचा दावा होत आहे. पुण्यात रोज जाणारे येणारे वाढलेत. त्यामुळे नियम न पाळल्यास त्रोटक संसर्ग वाढू शकतो, असेही वैद्यकीय जाणकार म्हणाले.  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Citizens of Purandar taluka, be careful, Corona will come to your house