आधी रस्त्यावरील खड्डे बुजवा; सांगवीकरांनी केली मागणी

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 12 September 2020

आधीच लॉकडाऊनमध्ये रखडलेली कामे सध्या अधूनमधून सतत पडणाऱ्या पावसामुळे संथगतीने सुरू आहेत. गतआठवड्यातच जुनी सांगवी येथील शितोळेनगर चौक सिमेंट रस्त्यावर मोठा अपघात झाला होता.

जुनी सांगवी (पुणे) : जुनी सांगवी, नवी सांगवी परिसरातील मुख्य रस्त्यावरील धोकादा़यक आणि वाहतुकीसाठी अडथळा ठरणारे खड्डे दुरूस्त करण्याची मागणी सांगवीतील नागरीकांनी केली आहे.

जुनी सांगवी, नवी सांगवी भागात विविध ठिकाणी रस्त्याची कामे सुरू आहेत. आधीच लॉकडाऊनमध्ये रखडलेली कामे सध्या अधूनमधून सतत पडणाऱ्या पावसामुळे संथगतीने सुरू आहेत. गतआठवड्यातच जुनी सांगवी येथील शितोळेनगर चौक सिमेंट रस्त्यावर मोठा अपघात झाला होता.

पुणेकरांच चाललंय काय? फक्त ९ दिवसांमध्ये मास्क न वापरणाऱ्यांकडून केला दीड कोटी रुपयांचा दंड वसूल​

याच रस्त्यावर नवी सांगवी, जुनी सांगवी, सांगवी फाटा यास जोडणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात रस्त्याच्या मधोमध खड्डे पडल्याने नागरीकांना येथून वाहने चालवणे जिकिरीचे झाले आहे. अशीच परिस्थिती जुनी सांगवी येथील मुळा नदीकिनारचा रस्ता, जुनी सांगवी, पिंपळे गुरव आणि नवी सांगवीला जोडणाऱ्या माहेश्वरी चौकात पावसाच्या पाण्यामुळे खड्ड्यात पाणी साचून डबकी तयार झाली आहेत.

नागरीकांना यातूनच ये-जा करावी लागत आहे. अनेकदा अंदाज न आल्याने दुचाक्या घसरून अपघात होण्याच्या घटना येथे नित्याच्या झाल्या आहेत. रस्त्याची कामे होतील तेव्हा होतील, मात्र रस्त्याची तात्काळ तात्पुरती का होईना दुरूस्ती करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. याबाबत माजी नगरसेवक अतुल शितोळे यांनीही लेखी निवेदनाद्वारे रस्त्याची संथ गतीने सुरू असलेली कामे गतीने करावीत, अशी मागणी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

जबरी चोरी करणाऱ्या दोघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या; मुद्देमाल केला जप्त​

येथील माहेश्वरी चौकात गेली अनेक दिवसांपासून मागणी करूनही येथील खड्डयाची दुरूस्ती करण्यात आलेली नाही.यामुळे अपघात होत आहेत.
- संजय मराठे, नागरीक

लॉकडाऊनमध्ये ही कामे बंद होती, ती पुन्हा सुरू करण्यात आलेली आहेत. काही ठिकाणी खड्डे दुरूस्तीचे काम केले आहे. पावसामुळे कामावर मर्यादा येत आहेत. पावसाच्या उघडीपीनंतर सर्व ठिकाणच्या दुरूस्त्या करण्यात येतील.
- राजू हत्ते, अथियंता, स्थापत्य विभाग, जुनी सांगवी.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Citizens of Sangvi demanded to repair potholes on roads in Sangvi area

Tags
टॉपिकस
Topic Tags: