पुणेकरांच चाललंय काय? फक्त ९ दिवसांमध्ये मास्क न वापरणाऱ्यांकडून केला दीड कोटी रुपयांचा दंड वसूल

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 12 September 2020

शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. मात्र लॉकडाऊन शिथिल झाल्यावर काही नागरिकांना कोरोना प्रादुर्भावाबाबत गांभीर्य नसल्याचे दिसत नाही. त्यामुळे अनेक नागरिक सर्रासपणे विनामास्क घराबाहेर पडत असल्याचे समोर आले आहे. या आजाराचा प्रसार अधिक होऊ नये, यासाठी विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. आपत्ती व्यवस्थापनांतर्गत महापालिका, नगरपालिका, ग्रामपंचायत आणि स्थानिक पोलिसांना या कारवाईचे अधिकार देण्यात आले आहेत.

पुणे : विना मास्क फिरणारे व मास्क असूनही त्याचा वापर न करणा-यांवर पोलिसांकडून सुरू असलेल्या कारवाईने आणखी जोर धरला आहे. दोन ते दहा सप्टेंबर या नऊ दिवसांच्या काळात 31जार 409 नागरिकांकडून एक कोटी 57 लाख 4 हजार 500 रुपयांचा दंड पोलिसांकडून वसूल करण्यात आला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. मात्र लॉकडाऊन शिथिल झाल्यावर काही नागरिकांना कोरोना प्रादुर्भावाबाबत गांभीर्य नसल्याचे दिसत नाही. त्यामुळे अनेक नागरिक सर्रासपणे विनामास्क घराबाहेर पडत असल्याचे समोर आले आहे. या आजाराचा प्रसार अधिक होऊ नये, यासाठी विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. आपत्ती व्यवस्थापनांतर्गत महापालिका, नगरपालिका, ग्रामपंचायत आणि स्थानिक पोलिसांना या कारवाईचे अधिकार देण्यात आले आहेत.

मास्क न घालता रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांवर तसेच दुचाकी, चारचाकी वाहनातून प्रवास करताना मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करून त्याच्याकडून पाचशे रुपये दंड घेण्यास सुरवात करण्यात आली आहे.

महत्त्वाची बातमी : पुणे जिल्ह्यातील `हा` भाग उद्यापासून सात दिवस राहणार बंद 

दोन सप्टेंबर पासून पुणे शहरात ही कारवाई सुरू करण्यात आली आहे. आठ सप्टेंबरपर्यंत पोलिसांनी 15 हजार 206 जणांवर ही कारवाई करून त्यांच्याकडून 73 लाख 3 हजार रुपयांचा दंड वसूल केला होता. त्यानंतरच्या दोन दिवसांतच हा आकडा दीड कोटीच्या घरात पोहोचला आहे.

सीसीटीव्हीद्वारे देखील कारवाई 
मास्क न घालता वाहने चालविणाऱ्या वाहन चालकांना सीसीटिव्ही कॅमे-यांच्या माध्यमातून देखील दंड केला जात आहे. तसेच पोलिस रस्त्यावर अशा वाहन चालकांवर लक्ष ठेवून आहेत. दंडाची रक्कम देण्यावरून पोलिस आणि वाहन चालकांमध्ये हुज्जत होत असल्याचे प्रसंग शहरात अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे.

Breaking : राज्य सरकारने रेडी-रेकनरच्या दरात केली वाढ; सर्वाधिक पुणे जिल्ह्यात तर...

''घराच्या बाहेर पडताना मास्क घालणे बंधनकारक आहे. दुर्लक्ष करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करून पाचशे रुपये दंड घेतला जात आहे. दंडाच्या कारवाईला घाबरून नाही तर नागरिकांना सुरक्षेच्या दृष्टीने मास्कचा वापर करावा.''
- बच्चन सिंग, पोलिस उपायुक्त, गुन्हे

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Pune 1 crore 50 lakhs fine levied on those who did not use the mask in just 9 days