esakal | कोरेगाव भीमा येथे नागरिकांची होणार आरोग्य तपासणी 
sakal

बोलून बातमी शोधा

Dr-Abhinav-Deshmukh

कोरेगाव भीमा (पेरणे फाटा) येथे एक जानेवारी रोजी विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पल्स ऑक्‍सीमीटर आणि थर्मामीटरद्वारे तपासणी करण्यात येणार आहे. नागरिकांना सॅनिटायझर उपलब्ध करून द्यावे, सोशल डिस्टन्सिंगच्या दृष्टीने आवश्‍यक खबरदारी घ्यावी.

कोरेगाव भीमा येथे नागरिकांची होणार आरोग्य तपासणी 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे - कोरेगाव भीमा (पेरणे फाटा) येथे एक जानेवारी रोजी विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पल्स ऑक्‍सीमीटर आणि थर्मामीटरद्वारे तपासणी करण्यात येणार आहे. नागरिकांना सॅनिटायझर उपलब्ध करून द्यावे, सोशल डिस्टन्सिंगच्या दृष्टीने आवश्‍यक खबरदारी घ्यावी. तसेच, पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. 

जिल्हाधिकारी डॉ. देशमुख आणि जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी मंगळवारी कोरेगाव भीमा विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रम स्थळाची पाहणी केली. आरोग्य पथके, पोलिस बंदोबस्त, अग्निशमन दल, पार्कींग सुविधा, वाहतूक व्यवस्था, विद्युत व्यवस्था, फिरत्या स्वच्छतागृहांची सोय याबाबत त्यांनी आढावा घेतला. कोरोनाचा संसर्ग वाढू नये, तसेच नागरिकांना आपल्या घरातून विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रम पाहता यावा, यादृष्टीने सह्याद्री वाहिनीवरून कार्यक्रमाचे प्रक्षेपण करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी गर्दी टाळून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी केले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी केलेल्या तयारीबाबत माहिती दिली. कार्यक्रम शांततेत पार पाडण्यासाठी नागरिकांनी घरातूनच अभिवादन करण्याचे आवाहन त्यांनी केले. 

न्यायालयीन कामकाज पूर्णतः सुरू करण्याला तारीख पे तारीख

सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता अतुल चव्हाण, अतिरिक्त पोलिस अधीक्षक विवेक पाटील, उपविभागीय अधिकारी संतोषकुमार देशमुख, सचिन बारावकर, पेरणे गावचे सरपंच रुपेश ठोंबरे, कोरेगाव भीमा विजयस्तंभ सेवा समितीचे अध्यक्ष सर्जेराव वाघमारे, विविध संस्था आणि संघटनांचे पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.

Edited By - Prashant Patil

loading image
go to top