esakal | न्यायालयीन कामकाज पूर्णतः सुरू करण्याला तारीख पे तारीख
sakal

बोलून बातमी शोधा

Court

राज्यातील सर्वच क्षेत्रांतील कामकाज आता पूर्ववत सुरू होत आहे. न्यायव्यवस्था देखील तितकीच महत्त्वाची आहे. ती पूर्णपणे सुरू नसल्याने पक्षकारांना न्याय मिळण्यास उशीर होत आहे. तसेच वकिलांचे उत्पन्न थांबले आहे. त्यामुळे आता लवकरात लवकर न्यायालये पूर्ण क्षमतेने सुरू व्हावीत, अशी आस ऍड. रेश्‍मा सोनार यांनी आहे.

न्यायालयीन कामकाज पूर्णतः सुरू करण्याला तारीख पे तारीख

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे - राज्यातील सर्वच क्षेत्रांतील कामकाज आता पूर्ववत सुरू होत आहे. न्यायव्यवस्था देखील तितकीच महत्त्वाची आहे. ती पूर्णपणे सुरू नसल्याने पक्षकारांना न्याय मिळण्यास उशीर होत आहे. तसेच वकिलांचे उत्पन्न थांबले आहे. त्यामुळे आता लवकरात लवकर न्यायालये पूर्ण क्षमतेने सुरू व्हावीत, अशी आस ऍड. रेश्‍मा सोनार यांनी आहे.

ऍड. रेश्‍मा या येथील जिल्हा न्यायालयात प्रॅक्‍टिस करतात. लॉकडाऊनमुळे त्यांच्या देखील वकिलीवर परिणाम झाला आहे. कोरोनाचा प्रसार वाढल्यापासून न्यायालयात केवळ महत्त्वाच्या प्रकरणांवरच सुनावणी होत आहे. ऑक्‍टोबरमध्ये लॉकडाऊनचे अनेक नियम शिथिल करण्यात आल्यानंतर न्यायालये पूर्ववत सुरू होतील, अशी स्थिती निर्माण झाली होती.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मात्र तेव्हा ते सुरू झाले नाहीत. त्यानंतर न्यायालयीन कामकाज कसे सुरू ठेवावे, याबाबत वकिलांचा अभिप्राय मागविण्यात आला होता. त्यात वकिलांचा कल हा पूर्ण वेळ न्यायालय सुरू करण्याकडे होता. हॉटेल, सिनेमागृह, पार्क, पर्यटन सुरू केले तर न्यायालय पूर्ण खुले करण्यात काय अडचण आहे, अशा प्रश्‍न आता वकील विचारू लागले आहेत. सध्या आहे त्याचप्रकारे 11 जानेवारीपर्यंत कामकाज सुरू राहील, असे आदेश सोमवारी प्रमुख जिल्हा न्यायाधीशांनी दिले आहेत.

धक्कादायक : अल्पवयीन मुलीवर बलात्कार करत काढले फोटो; दोन आरोपींना अटक 

दोन ऐवजी पुन्हा एक शिफ्ट
कोरोनाचा प्रसार काहीसा कमी झाल्यानंतर 21 सप्टेंबरपासून कामकाज दोन शिफ्टमध्ये सुरू करण्यात आले होते. मात्र त्यानंतर न्यायालयातील गर्दी वाढल्याने पुन्हा एकच शिफ्ट करण्यात आली होती. तसेच कामाच्या स्वरूपात देखील बदल करण्यात आले होते. तेव्हा देखील कामाची वेळ वाढविण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र ती अद्याप पूर्ण झाली नसल्याची खंत पक्षकार व वकील व्यक्त करीत आहेत.

हौशी पर्यटकाने अन्न शिजवण्यासाठी लावली आग अन्...

सर्वच सुरू झाले आहे तर न्यायालये देखील पूर्ण क्षमतेने सुरू करण्यास हरकत नाही, अशी आमची भूमिका आहे. याबाबत असोसिएशन उच्च न्यायालयाला पत्र देखील पाठविणार आहे. परवानगी मिळाल्यानंतर गर्दी झाल्यास कोरोनाचा फैलाव होणार नाही याविषयीची खबरदारी घेण्याची यंत्रणा उपलब्ध करू. उच्च न्यायालय आणि बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र ऍण्ड गोवाच्या पदाधिका-यांची पाच जानेवारीला बैठक होणार आहेत. त्यात काही महत्त्वाचे निर्णय होऊ शकतात.
- ऍड. सतीश मुळीक, अध्यक्ष, पुणे बार असोसिएशन

Edited By - Prashant Patil

loading image
go to top