esakal | महत्त्वाची बातमी : मास्क नसल्यास बसणार 500 रुपयांचा भूर्दंड!
sakal

बोलून बातमी शोधा

Mask

दंडाची रक्कम वसूल करण्याचे अधिकार पोलिस, पोलिस मित्र, आरोग्य सेवक आणि महापालिका कर्मचारी यांना देण्यात आल्याचे विभागीय आयुक्त राव यांनी सांगितले.

महत्त्वाची बातमी : मास्क नसल्यास बसणार 500 रुपयांचा भूर्दंड!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क (Mask) न घालणाऱ्या नागरिकांना पाचशे रुपये तर, सार्वजनिक ठिकाणी थुंकतांना आढळल्यास एक हजार रुपये दंड (Fine) आकारण्याचे आदेश विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत.

जिल्ह्यातील पुणे शहर, पिंपरी चिंचवड शहर आणि ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. तो रोखण्यासाठी नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी प्रवास करताना, फिरताना आपल्या तोंडावर मास्क घालणे आवश्यक आहे. तथापि, काही नागरिक मास्क न घालता फिरताना दिसतात. अशा नागरिकांमुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. दंडाची रक्कम वसूल करण्याचे अधिकार पोलिस (Police), पोलिस मित्र, आरोग्य सेवक आणि महापालिका कर्मचारी यांना देण्यात आल्याचे विभागीय आयुक्त राव यांनी सांगितले.

वडिलांच्या मृत्यूचे दु:ख बाजूला ठेवत 'त्या' कार्यकर्त्याने केला प्लाझ्मा दान अन् वाचवला एकाचा जीव!

दरम्यान, गुरुवारी (ता.२७) पुण्यात साडेपाच महिन्यातील उच्चांकी रुग्णांची नोंद झाली. साडेतीन हजारापेक्षा जास्त रुग्ण आढळण्याची ही सहावी वेळ ठरली. मास्क न वापरणे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणे यांसारख्या प्रकारांमुळे रुग्णांची संख्या वाढत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. यामुळे मास्क न वापरणाऱ्यास पाचशे रुपये दंड आकारला जाणार आहे. 

हा दंड आकारताना कुणी हुज्जत घातली तर ती संबंधित व्यक्ती, संस्था किंवा संघटनेविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम १८१ अन्वये योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

loading image