esakal | वडिलांच्या मृत्यूचे दु:ख बाजूला ठेवत 'त्या' कार्यकर्त्याने केला प्लाझ्मा दान अन् वाचवला एकाचा जीव!
sakal

बोलून बातमी शोधा

Corona-Plasma-Theropy

पुण्यातील मार्केटयार्ड भागात राहणारे अविनाश गोतारणे यांचे वडील ज्ञानेश्‍वर यांचा गेल्या महिन्यात कोरोनामुळे मृत्यू झाला. अविनाश यांची आई आणि त्यांनाही कोरोनाची लागण झाली.

वडिलांच्या मृत्यूचे दु:ख बाजूला ठेवत 'त्या' कार्यकर्त्याने केला प्लाझ्मा दान अन् वाचवला एकाचा जीव!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : वडिलांचे कोरोनामुळे निधन, आईदेखील कोरोना पॉझिटिव्ह, स्वतःला देखील कोरोनाची लागण... अशा परिस्थितीतून बरं झाल्यावर आणि सावरल्यावर पुण्यातील एका कॉंग्रेस कार्यकर्त्याने गरजू रुग्णाला शुक्रवारी (ता.२८) प्लाझ्मा दान करत सामाजिक बांधिलकी दाखवून दिली. कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांनीही प्लाझ्मा दानासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

...तोपर्यंत न्यायालयाचं कामकाज मर्यादित राहणार!​

पुण्यातील मार्केटयार्ड भागात राहणारे अविनाश गोतारणे यांचे वडील ज्ञानेश्‍वर यांचा गेल्या महिन्यात कोरोनामुळे मृत्यू झाला. अविनाश यांची आई आणि त्यांनाही कोरोनाची लागण झाली. दोघांनीही कोरोनाशी चांगल्या प्रकारे सामना केला. त्यातून आता दोघेही बरे झाले आहेत. सर्व प्रकारची काळजी घेऊन त्यांनी आता त्यांचे दैनंदिन आयुष्य नियमितपणे सुरूही केले आहे.

दरम्यान, कोरोनाची लागण झालेल्या एका रुग्णाला प्लाझ्माची गरज आहे, अशी माहिती शहर कॉंग्रेसचे पदाधिकारी रमेश अय्यर यांना समजली. त्यांना प्लाझ्मा दान करण्यास इच्छुक असलेली व्यक्ती सापडेना. त्यांनी गोतारणे यांच्याशी संपर्क साधला. तसेच प्रदेश कॉंग्रेसचे सरचिटणीस अभय छाजेड यांनीही गोतारणे यांची समजूत काढली. ज्या रुग्णाला प्लाझ्मा पाहिजे होता, त्याच्यासाठी एकाने प्लाझ्मा देण्याची तयारी दर्शविली. त्यानुसार वैद्यकीय तपासण्या झाल्या. परंतु, इच्छुक व्यक्तीचा प्लाझ्मा रुग्णाशी मॅच झाला नाही.

एक कोटीहून जास्त गणेशक्तांनी 'दगडूशेठ गणपती'चे घेतले ऑनलाईन दर्शन!​

त्यामुळे अय्यर यांनी गोतारणे यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी तयारी दर्शविली. त्यानुसार वैद्यकीय तपासण्या झाल्यावर प्लाझ्मा मॅच झाला. त्यामुळे संबंधित रुग्णाला प्लाझ्मा देण्याची प्रक्रिया गुरुवारी सुरू झाली. त्यातच गोतारणे यांचा शुक्रवारी वाढदिवस होता. याबाबत गोतारणे म्हणाले, ''कोरोनाचा सामना करताना धैर्य बाळगले पाहिजे. पुरेशी काळजी घेतल्यावर प्लाझ्मा देणे शक्‍य होते. त्यातून एखाद्या रुग्णाचा जीव वाचू शकतो. एका रुग्णाचा जीव वाचविण्यासाठी माझा प्लाझ्मा उपयोगी पडला, ही माझ्यासाठी समाधानाची बाब आहे.''

अबुधाबीतील कंपनी विकसित करणार 'डीएसके ड्रीम सिटी'; प्रस्ताव न्यायालयात सादर​

अय्यर म्हणाले, ''कोरोनामुळे परिस्थिती अवघड झाली आहे. अनेक रुग्णांचा व्हेंटिलेटर, ऑक्‍सिजन बेड न मिळाल्यामुळे शहरात मृत्यू झाला आहे. आता जंबो कोविड केअर सेंटर सुरू झाले असले तरी, रुग्णालयांत बेड मिळणे आव्हानात्मक आहे. तसेच उपचार घेत असलेल्या अनेक रुग्णांना प्लाझ्माची गरज आहे. ते लक्षात घेऊन कोरोनामुक्त झालेल्यांनी प्लाझ्मा दानावर भर देणे काळाची गरज आहे.''

पुणे जिल्ह्यात कोरोनाचे गुरुवारी ३ हजार ७०३ रुग्ण सापडले आहेत. तर, ६९ जणांचा मृत्यू झाला. पुणे शहरातून १७७३, तर पिंपरी-चिंचवडमधून ११०५ आणि जिल्ह्यातून ६४९ रुग्ण आढळले आहेत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

loading image