Pune News : पुण्यात झाडणकामाची झाडाझडती; आयुक्त नवल किशोर राम, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची जातीने पाहणी
Pune City Issues : पुण्यातील अस्वच्छता, अनधिकृत फलक, राडारोडा यामुळे निर्माण झालेल्या विद्रूपीकरणाच्या पार्श्वभूमीवर आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून जबाबदार यंत्रणांना निर्देश दिले.
पुणे : सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता, अनधिकृत फलक, ठिकठिकाणी पडलेला राडारोडा... यांमुळे पुणे विद्रूप झाले असताना महापालिका आयुक्त नवल किशोर राम, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी या दोघांनी स्वतः प्रत्यक्ष बाहेर पडून विविध ठिकाणी पाहणी केली.