सिटी सर्व्हेचा प्रस्ताव लाल फितीत

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 29 जानेवारी 2020

महापालिकेमध्ये समावेश झालेल्या गावांचा सिटी सर्व्हे करण्यासंदर्भात वर्षापूर्वी भूमी अभिलेख विभागाकडे प्रस्ताव दिला आहे. त्यानंतर रेकॉर्ड अपडेट ठेवण्यासाठी पालिकेला फायदा होणार आहे. 
- प्रशांत शिंपी, नगररचनाकार, महापालिका

पिंपरी - पालिकेत समाविष्ट झालेल्या १४ गावांच्या सिटी सर्व्हेला २४ वर्षांमध्ये मुहूर्तच सापडलेला नाही. पालिकेने भूमी अभिलेख विभागाकडे प्रस्ताव वर्षभरापूर्वी दिला 
असला तरी, हे काम लालफितीतच अडकले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

१९९६ मध्ये हद्दवाढीनंतर पालिकेमध्ये समावेश गावांचे रेकॉर्ड आजही ब्रिटिशकालीनच आहे. या गावांमध्ये अनेक ठिकाणी बंगले, टाऊनशिप उभे राहत आहेत. शहराचा नवीन विकास आराखडा तयार होत असताना गावांच्या विकासासाठी सर्वेक्षणाची गरज आहे. 

सर्वेक्षणासाठी तीन वर्षे 
या १४ गावांचे क्षेत्र मोठे असल्याने सर्वेक्षणासाठी तीन वर्षे लागतील. सर्वेक्षणासाठी भूमी अभिलेख विभागाने खासगी संस्थांना कंत्राट दिले आहे. यासाठी लागणारा खर्च महापालिका देईल. 

या गावांचा होणार सर्व्हे
डुडुळगाव, तळवडे, चिखली, मोशी, बोऱ्हाडेवाडी, चोवीसावाडी, वडमुखवाडी, चऱ्होली, मामुर्डी, किवळे, रावेत, पुनावळे, वाकड, ताथवडे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: City survey proposal in red ribbon