पुणे महापालिकेतर्फे महिलांसाठी 13 नवीन मोबाईल टॉयलेट्स 

वृत्तसंस्था
शनिवार, 16 जून 2018

महापालिकेतर्फे महिलांसाठी शहरात 13 नवीन मोबाईल टॉयलेट्स उभारण्याची योजना आखण्यात आली आहे. शहरात यापूर्वी दहा मोबाईल टॉयलेट्स कार्यरत आहेत. वापरात नसलेल्या बसचे रुपांतर शौचालयात करुन, त्यांचा वापर गर्दीच्या ठिकाणी महिलांसाठी टॉयलेट्स उभारण्यासाठी करण्यात येणार आहे. 

पुणे- महापालिकेतर्फे महिलांसाठी शहरात 13 नवीन मोबाईल टॉयलेट्स उभारण्याची योजना आखण्यात आली आहे. शहरात यापूर्वी दहा मोबाईल टॉयलेट्स कार्यरत आहेत. वापरात नसलेल्या बसचे रुपांतर शौचालयात करुन, त्यांचा वापर गर्दीच्या ठिकाणी महिलांसाठी टॉयलेट्स उभारण्यासाठी करण्यात येणार आहे. 

महापालिकेतर्फे या कामासाठी 25 लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत. या योजनेनुसार बसमध्ये पाच शौचालये असतील, त्यातील तीन भारतीय पद्धतीची तर दोन पाश्चात्य पद्धतीची शौचालये असतील. या शौचालयामध्ये पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी सेन्सर बसवण्यात आले आहेत. तसेच, सॅनिटरी नॅपकिन्सची विल्हेवाट लावण्यासाठी 'सॅनिटरी नॅपकिन डिस्पेनसिंग मशिन' बसवण्यात आले आहे. सुरुक्षिततेच्या दृष्टिने या शौचालयात पॅनिक बटनची सुविधाही उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. 

पुणे महापालिकेतर्फे 2016 मध्ये 100 जुन्या बसचे शौचालयात रुपांतर करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. मुंबई उच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर शहरातील महिलांना सार्वजनिक शौचालयाच्या चांगल्या सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचलण्यात आले आहे.

आतापर्यंत शहरात अशी दहा शौचालये उभारण्यात आलेली आहेत, असे पुणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. जंगली महाराज रस्ता, शिवाजीनगर, औंध, विश्रांतवाडी, आनंदनगर, शनिवारवाडा, फुलेनगर आणि बाणेर या ठिकाणी मोबाईल टॉयलेट्स उभारण्यात आली आहेत. या योजनेदरम्यान एका बसचे शौचालयात रुपांतर करण्यासाठी 1.92 लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत महानगरपालिकेने पुण्यातील 15 भागात 25,000 सार्वजनिक शौचालये उभारली आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Civic body to set up 13 more mobile toilets for women in scrapped buses