

BJP Corporators Face Off
Esakal
पुणे महापालिकेतील ‘टक्केवारी’च्या मुद्द्यावरून आजी-माजी नगरसेविकांमध्ये राडा झाल्याच्या प्रकाराची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. सत्ताधारी भाजपच्या गोटातच टक्केवारीच्या या राड्यामुळे आता अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. बाणेर येथील आदिवासी विद्यार्थिनींसाठी उभारण्यात येणाऱ्या निवासी शिक्षण केंद्राच्या कामावरून विद्यमान आणि माजी नगरसेविकांमध्ये महापालिकेतच जोरदार वादावादी झाली. यावेळी शिवीगाळ केल्याचा आणि गोंधळ घातल्याचा प्रकार घडला. या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने महापालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे. Heated argument in Pune municipal office between former and current corporators