

पुणे - राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावीच्या प्रवेशासाठी सोमवारपासून (ता. २९) पहिली विशेष फेरी राबविण्यात येत आहे. केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेअंतर्गत (कॅप) नवीन विद्यार्थ्यांची नोंदणी, अर्ज भाग एकमध्ये दुरूस्ती, महाविद्यालयांचा पसंतीक्रम भरणे, प्रवेश अर्ज लाॅक करणे या प्रक्रियेला सोमवारपासून ते बुधवारपर्यंत (ता. १) मुदत आहे. या फेरीची वाटप यादी शुक्रवारी (ता. ३) जाहीर होणार आहे.