
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाच्या वतीने 13 जानेवारीपासून एफसीएफएस फेरी राबविण्यात येत आहे.
पुणे : इयत्ता अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेतील प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य (एफसीएफएस) फेरी अंतर्गत दुसऱ्या संवर्गातील विद्यार्थ्यांना सोमवारी (ता.18) सायंकाळी पाच वाजेपर्यंत संबंधित महाविद्यालयांत प्रवेश निश्चित करता येणार आहे.
- ‘पीएम केअर फंडा’चा हवाय हिशोब; माजी अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांना विचारले प्रश्न
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाच्या वतीने 13 जानेवारीपासून एफसीएफएस फेरी राबविण्यात येत आहे. या फेरीच्या पहिल्या टप्प्यात पहिल्या संवर्गासाठी म्हणजेच 90 टक्के आणि त्यापेक्षा अधिक गुण असलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी उपलब्ध करून देण्यात आली होती. ही प्रक्रिया 15 जानेवारीपर्यंत सुरू होती. त्यानंतर दुसऱ्या संवर्गातील म्हणजेच 80 टक्के आणि त्यापेक्षा अधिक गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठीची प्रक्रिया सुरू आहे.
या अंतर्गत ऍलॉट झालेल्या महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी सोमवारपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. कनिष्ठ महाविद्यालयात झालेले प्रवेश संकेतस्थळावर नोंदविण्यासाठी महाविद्यालयांना सोमवारी रात्री आठ वाजेपर्यंत अतिरिक्त वेळ देण्यात आला आहे. त्यानंतर पुढील टप्प्यातील तिसऱ्या संवर्गासाठीची म्हणजेच 70 टक्के आणि त्यापेक्षा अधिक गुण असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेशाची संधी उपलब्ध होणार आहे.
- EDने रॉबर्ट वड्रांकडे वळवला मोर्चा; ताब्यात घेण्यासाठी हायकोर्टात केला अर्ज
अकरावी प्रवेशाच्या "एफसीएफएस' फेरीसाठी गुणांनुसार एकूण सात संवर्ग केले आहेत. प्रत्येक संवर्गातील विद्यार्थ्यांना टप्प्या-टप्प्याने प्रवेश दिले जात आहेत. सातव्या संवर्गातील प्रवेशाची प्रक्रिया 29 जानेवारीला सुरू होऊन 30 जानेवारीपर्यत संपेल. त्यानंतर सर्वसाधारण अंतिम रिक्त जागांचा तपशील 31 जानेवारीला जाहीर होईल, अशी माहिती राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने दिली आहे.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
(Edited by: Ashish N. Kadam)