esakal | EDने रॉबर्ट वड्रांकडे वळवला मोर्चा; ताब्यात घेण्यासाठी हायकोर्टात केला अर्ज
sakal

बोलून बातमी शोधा

Robert_Vadra

२०१२ मध्ये वड्रा यांच्या कंपनीने काही दलालांमार्फत जोधपूरच्या कोलायत भागात २७० बीघा जमीन ७९ लाख रुपयांमध्ये खरेदी केली होती. भारतीय सैन्याच्या महाजन फील्ड फायरिंग रेंजसाठी ही जमीन देण्यात आली होती.

EDने रॉबर्ट वड्रांकडे वळवला मोर्चा; ताब्यात घेण्यासाठी हायकोर्टात केला अर्ज

sakal_logo
By
वृत्तसंस्था

जोधपूर : ज्येष्ठ उद्योजक आणि काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वड्रा यांच्या अडचणींमध्ये वाढ होताना दिसत आहे. ईडीने (अंमलबजावणी संचालनालय) वड्रा यांच्याविरोधात राजस्थान उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. 

त्यानंतर आता राजस्थान उच्च न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बेनामी मालमत्ता प्रकरणी रॉबर्ट वड्रा आणि महेश नागर यांना ताब्यात घेऊन चौकशी करण्यासाठी ईडीने परवानगी मागितली आहे. या याचिकेवर सोमवारी सुनावणी होणार आहे. एएसजी राजदीपक रस्तोगी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आणि भानु प्रताप बोहरा ईडीचा पक्ष सांभाळतील. तर केटीएस तुलसी हे वड्रा यांची बाजू मांडणार आहेत. 

खलिस्तानी आणि अल-कायदाचा भारताला धोका; हल्ल्याची शक्यता​

काय प्रकरण आहे?
२००७मध्ये वड्रा यांनी स्काइलाइट हॉस्पिटॅलिटी प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी सुरू केली. ते आणि त्यांची आई मौरीन हे दोघं कंपनीचे संचालक होते. काही दिवसांनंतर कंपनीचे नाव स्कायलाइट हॉस्पिटॅलिटी लिमिटेड लायबिलिटी असे करण्यात आले. ही कंपनी रेस्टॉरंट, बार आणि कँटीन या संबंधीची कामे पाहिल, असं नोंदणीच्या वेळी सांगितलं होते. 

२०१२ मध्ये जमीन खरेदी 
२०१२ मध्ये वड्रा यांच्या कंपनीने काही दलालांमार्फत जोधपूरच्या कोलायत भागात २७० बीघा जमीन ७९ लाख रुपयांमध्ये खरेदी केली होती. भारतीय सैन्याच्या महाजन फील्ड फायरिंग रेंजसाठी ही जमीन देण्यात आली होती. येथून विस्थापित झालेल्यांसाठी १४०० बीघा जमीन दुसर्‍या ठिकाणी देण्यात आली होती, पण काही लोकांनी या जागेची बनावट कागदपत्रे तयार करुन ती वड्रा यांच्या कंपनीला विकली.

‘पीएम केअर फंडा’चा हवाय हिशोब; माजी अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांना विचारले प्रश्न​

ही जमीन सैन्याच्या मालकीची असून ती विकली जाऊ शकत नाही, असे सांगण्यात आलं आहे. याच लोकांच्या माध्यमातून वड्रा यांनी जवळपासच्या काही खेड्यांमध्ये आणखी जमीन खरेदी करण्याचा प्रयत्न केला, परंतु हे प्रकरण पुढे जाऊ शकले नाही. बनावट मार्गाने जमीन विकल्याचा प्रकार उघडकीस येण्यापूर्वी वड्रा यांच्या कंपनीने ही जमीन पाच कोटी रुपयांना विकून टाकली. या प्रकरणात ईडीने काही स्थानिक अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यांच्या सहकार्यानेच काही लोकांनी त्या जागेची बनावट कागदपत्रे तयार केली होती.

आझम खान यांना मोठा झटका; योगी सरकारला द्यावी लागणार 70 हेक्टर जमीन

मनी लाँड्रिंगशी संबंध
मनी लाँड्रिंगशी संबंधित प्रकरणात चौकशी सुरू करण्यात आली होती. ईडीची चौकशी टाळण्यासाठी वड्रा यांनी बराच काळ प्रयत्न केला होता. अनेक वेळा समन्स बजावूनही वड्रा बराच काळ ईडीसमोर हजर झाले नाहीत. उलट वड्रा यांनीच ईडीविरोधात अपील दाखल करत हायकोर्टत प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर हायकोर्टने वड्रा आणि त्यांच्या आई मौरीनला १२ फेब्रुवारीला ईडीसमोर हजर राहण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर वड्रा जयपूरमध्ये ईडीसमोर हजर झाले होते.

- देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)