
पुणे : ‘जिल्ह्यातील प्रमुख नद्या प्रदूषणमुक्त करण्यासाठी या नद्यांना मिळणाऱ्या छोट्या नदी-नाल्यांवर प्रक्रिया करण्यासाठी प्रकल्प उभारण्यात येणार आहे. त्यासाठी पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि जिल्हा परिषदेतील अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेतली जाईल,’’ अशी माहिती केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी शुक्रवारी (ता. २९) दिली.