Water Supply : धायरी, नऱ्हे गावाला मिळणार शुद्ध पाणी

पुणे महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या धायरी व नऱ्हे गावाला होणार शुद्ध पाणी पुरवठा
Clean Water Supply
Clean Water Supplysakal
Updated on

पुणे - पुणे महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या धायरी व नऱ्हे गावाला होणार शुद्ध पाणी पुरवठा करण्यासाठी महापालिकेतर्फे वडगाव जलशुद्धीकरण केंद्रातून येणारी जलवाहिनी जोडली जाणार आहे, त्यासाठी सुमारे ७० कोटीचा खर्च येणार आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी दिली.

पुणे महापालिकेत समाविष्ट झालेल्या सिंहगड रस्त्यावरील नवीन गावांमध्ये शुद्ध केलेले पाणी पुरविले जात नाही. धरणातील पाणी जलविनीतून आणून ते विहिरीत टाकले जाते. तेथून हे पाणी पंपिंग करून गावांमध्ये पोचविले जाते.

शुद्ध न केलेल्या या पाण्यामुळे या भागात जीबीएसचे रुग्ण आढळून आले. त्यातील काही जणांचा मृत्यू झाला आहे. तर काही जण अजूनही रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यापार्श्‍वभूमीवर महापालिकेने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

पुणे शहराच्या जुन्या हद्दीतील धायरी गावाला वडगाव जलशुद्धीकरण केंद्रावरून पाणी पुरवठा केला जातो. त्या जलवाहिनीतून आता नव्या हद्दीतील धायरी व नऱ्हे या गावाला शुद्ध पाणी देण्याचे नियोजन महापालिकेने केले आहे.

यासाठी पाणी पुरवठा विभाग शुद्ध पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिनीला २०० मिटर लांबीची जलवाहिनी जोडली जाणार आहे. त्यासाठी ७० लाख रुपयांचा खर्च केला जाणार असून, त्याची निविदा प्रक्रिया सुरु केली आहे. काम मंजूर झाल्यानंतर दोन महिन्यात हे काम पूर्ण होईल.

क्लोनिरेशनसाठी ८५ लाखाचा खर्च

धायरी, खडकवासला, नांदेड, नऱ्हे, किरकटवाडी या भागात गुलियन बॅरी सिंड्रोमचे (जीबीएस) रुग्ण आढळून आल्यानंतर महापालिकेने या परिसराला पाणी पुरवठा करणाऱ्या नांदेड विहीर, बारांगणे मळा विहीर, खडकवासला जॅकवेल, प्रयेजा सिटी या चार ठिकाणी क्लोरिनेशन मशिन बसवले आहे. यासाठी ८७ लाख रुपयांचा खर्च करण्यात आला आहे, अशी माहिती पृथ्वीराज बी.पी. यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com