पुणे - विना हेल्मेट, सीटबेल्ट न लावता वाहन चालविणे, सिग्नल तोडणे, विना नंबरप्लेट गाडी चालविणे यांसह अनेक प्रकारच्या वाहतूक नियमांचा भंग केल्याप्रकरणी आकारण्यात आलेल्या दंडाच्या रकमेत आता वाहनचालकांना सवलत मिळणार आहे. प्रलंबित दंड जास्तीत जास्त सवलतीने भरण्याची संधी पुणेकरांना बुधवारपासून (ता. १०) शनिवारपर्यंत (ता. १३) होणाऱ्या राष्ट्रीय लोकअदालतीत मिळणार आहे.