

हवामान अनुकूल शेतीबाबत
शेतकऱ्यांना मार्गदर्शन
वाशीम : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत मानोरा तालुक्यातील ज्योतिबानगर येथे शेतीशाळेत बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर पिकांचे संरक्षण, उत्पादन खर्चात बचत आणि एकात्मिक कीड व्यवस्थापनाबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
या वेळी सहायक कृषी अधिकारी आर. डी. हाके व समूह सहायक प्रफुल राठोड यांनी एकात्मिक कीड व्यवस्थापनाची माहिती दिली. पिकांमध्ये किडींचा प्रादुर्भाव होण्यापूर्वी त्यांची ओळख, नियमित पीक निरीक्षण आणि आर्थिक नुकसान पातळीनुसार नियंत्रण उपाययोजना करण्याचे महत्त्व स्पष्ट करण्यात आले.
शेतीशाळेत दशपर्णी अर्क व निंबोळी अर्क तयार करण्याची पद्धत, त्यांचा योग्य वापर आणि घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच कामगंध सापळ्याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक घेऊन ते शेतात योग्य ठिकाणी कसे लावावे, नियमित निरीक्षण कसे करावे आणि त्याद्वारे किडींच्या प्रादुर्भावावर लक्ष कसे ठेवावे, याचे प्रशिक्षण देण्यात आले. मावा, तुडतुडे, पांढरी माशी व फुलकिडे आदी रसशोषक किडींची ओळख, त्यांचा प्रादुर्भाव आणि नियंत्रणाच्या उपाययोजनांची माहितीही देण्यात आली. किडींची अचूक ओळख व प्रादुर्भावाची तीव्रता तपासूनच आवश्यकतेनुसार नियंत्रण उपायांचा अवलंब करावा, असे सांगण्यात आले. शेतीशाळेला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष प्रात्यक्षिकात सहभागी होत पीक संरक्षण व कीड व्यवस्थापनाबाबत प्रश्न विचारले.
agnakola20aug1
वाशीम ः पोकरा प्रकल्पांतर्गत आयोजित शेतीशाळेत मार्गदर्शन करण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.