esakal | जपानमधील कोरोना रुग्णांवर करणार आयुर्वेदाची क्लिनिकल ट्रायल

बोलून बातमी शोधा

Ayurved
जपानमधील कोरोना रुग्णांवर करणार आयुर्वेदाची क्लिनिकल ट्रायल
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - भारताची प्राचीन वैद्यकीय परंपरा असलेल्या आयुर्वेदाची मात्रा आता प्रायोगिक तत्त्वावर जपानच्या नागरिकांना देण्यात येणार आहे. त्यासाठी आयुर्वेदिक वनस्पती आणि काढ्याची मागणी देशातील आयुर्वेदिक उत्पादकांकडे झाली आहे. कोरोनाबाधित रुग्णांवर आयुर्वेदाची मात्रा वापरण्याबद्दल जपानच्या इझ्युमिओत्सु शहराच्या महापौरांनी ई-मेलद्वारे आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉ. सुकुमार सरदेशमुख यांनी दिली.

याबद्दल माहिती देताना डॉ. सरदेशमुख म्हणाले, ‘‘जपानमध्ये ओसाका राज्यात इझ्युमिओत्सु हे शहर आहे. तेथील महापौर केनिची मेनमाइड यांना आयुर्वेदिक काढा भारतीय नागरिकांना दिला. त्यानंतर हा काढा गुणकारी असल्याचा विश्वास महापौरांना झाला. त्यामुळे भारतीय वैद्यकशास्त्राची प्रदीर्घ परंपरा असेलल्या आयुर्वेदिक औषधांचा वापर जपानमधील नागरिकांसाठी करण्यात येणार आहे. त्यासाठी आयुर्वेदातील काही वनस्पती मागविण्यात आल्या आहेत.’’

आयुर्वेदातील गुळवेल, अश्वगंधा, तुळस, ज्येष्ठमध यांचा काढा श्वसनसंस्थेवरील जंतुप्रादुर्भावावर उपयुक्त ठरताे. त्यामुळे याचे मिश्रण करून हा काढा तयार करण्यात आला आहे.

- डॉ. सुकुमार सरदेशमुख, आयुर्वेदिक तज्ज्ञ