पुणे जिल्ह्यातील सर्व टोल नाके बंद करा - संभाजी ब्रिगेड

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 फेब्रुवारी 2020

खेड शिवापूरसह जिल्ह्यातील सर्व टोल नाके बंद करावेत, या मागणीसाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारपासून (ता. ३) बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.

पुणे - खेड शिवापूरसह जिल्ह्यातील सर्व टोल नाके बंद करावेत, या मागणीसाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारपासून (ता. ३) बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दरम्यान, या संदर्भात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणासह संबंधित घटकांची लवकरच एकत्रित बैठक घेण्यात येईल, असे आश्‍वासन जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आले आहे. 
संभाजी ब्रिगेडच्या वतीने जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांना निवेदन देण्यात आले. वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी टोल प्रशासनाकडून प्रयत्न केले जात नाहीत. त्यामुळे खेड शिवापूर टोल नाका बंद करून तो पुणे जिल्ह्याच्या बाहेर हटविण्यात यावा. तसेच, जिल्ह्यातील सोलापूर रस्ता, सोमाटणे फाटा, मोशी टोल नाका आणि सातारा रस्त्यावरील सर्वच टोल नाके बंद करण्यात यावेत. टोल नाका बंद होईपर्यंत मागे हटणार नाही, असा इशारा ब्रिगेडने दिला आहे. या आंदोलनात शिंदे यांच्यासह गणेश चऱ्हाटे, पंढरीनाथ सोंडकर, मंदार बहिरट, दत्ता खुटवड आदी सहभागी झाले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Close all toll naka blocks in Pune district sambhaji brigade