
पाषाण : पाषाण-सूस रस्त्यावरील दुभाजक बंद केल्याने बाणेरकडे जाण्यासाठी तीन किलोमीटरचा हेलपाटा मारावा लागत आहे. त्यामुळे हा वेळ व प्रवास टाळण्यासाठी वाहनचालक सध्या सूस रस्त्यावरून उतरून पाषाणकडे विरुद्ध दिशेने धोकादायक प्रवास करत आहेत. याबाबत महापालिकेने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.