esakal | दीडशे कापडी बाहुल्यांची स्वप्ननगरी
sakal

बोलून बातमी शोधा

कापडी बाहुल्या

दीडशे कापडी बाहुल्यांची स्वप्ननगरी

sakal_logo
By
-अन्वर मोमीन --------------------

वडगाव शेरी : आपल्या देशातील कश्मीर ते कन्याकुमारीपर्यंतच्या विवीधतेतील सौंदर्य तेथील वैशिष्ठ्यपुर्ण वेशभुषेतून खुलत असते. अशा वेशभुषा केलेल्या तब्बल दिडशे प्रकारच्या कापडी बाहुल्या आपणास एकाच ठिकाणी पाहाता आल्या तर. हे शक्य आहे. कारण अशा कापडी बाहुल्या बनवण्याचा अऩोखा छंद वडगाव शेरीतील एका जोडप्याने तब्बल पन्नास वर्ष जोपासला आहे. रजनी आणि शिवाजी शिदोडकर असे या पतीपत्नीचे नाव आहे.

हे दोघे वडगाव शेरीतील आनंद पार्क येथे राहातात. निवृत्ती पुर्वी सरकारी नोकरीत असणारे शिवाजी शिदोडकरांना तरूणवयापासुनच हस्तकलेची आवड जडली. त्यानंतर विवाह झाला. पत्नी रजनी यांनीही पतीचा हा छंद आपला केला. अन् सुरू झाला अऩोखा प्रवास. भारतीय वेशभुषेच्या विविधतेतील सौंदर्य स्थळांचे निरीक्षण करून त्यांना बाहुल्यांच्या रुपात साकारण्याची अऩोखी कला दोघांनी आनंदाने जपली आहे.

दोरा, कापड, कापूस आदी जुजबी वस्तु वापरून हे दोघे बाहुली साकारतात. बाहुलिचा शरिराचा ढाचा तयार झाल्यावर त्यावर पोषाखाचा साज चढवला जातो. दागिन्यांनी शृंगार केला जातो. त्यांच्या हालचाली, चेहऱ्यारचे हावभाव अचुक टिपून तशी सजावट केली जाते. त्यामुळे पाहाता पाहता आजपर्यंत त्यांच्याकडे तब्बल दिडशे प्रकारच्या विविध बाहुल्यांची अनोखी स्वप्ननगरी वास्तव्याला आहे.

हेही वाचा: Pune : सायबर भामट्याकडून महिलेची ११ लाखांची फसवणूक

बाहुल्यांचे प्रदर्शऩ मांडताना त्या राज्यातील निसर्ग, इमारती, वाडे, महाल, धार्मिक स्थळे यांचे रेखाटलेले चित्र मागे ठेवून प्रदर्शनात आणखी जीवंतपणा आणण्याचा उभयतांचा प्रयत्न असतो. आजपर्यंत त्यांनी या कलेची ओळख समाजाला व्हावी याकरीता शेकडो ठिकाणी प्रदर्षने मांडली आहेत. एक बाहुली बनवायला त्यांना तीन ते चार दिवस लागतात.

छंदाविषयी शिवाजी शिदोडकर म्हणाले, कश्मिरपासून कन्याकुमारीपर्यंतच्या सर्व राज्यांची लोकसंस्कृती आभ्यासून, निरीक्षक करून आम्ही बाहुल्या साकारल्या आहेत. रजनी शिदोडकर म्हणाल्या, बाहुल्यांकरीता आम्ही देशभर फिरलो. तेथील चालीरिती, वेषभुषा समजुन घेतल्या. अभ्यास केला. पुस्तके, चित्रे यांचा संदर्भ घेतला. त्यामुळे बाहुलीच्या रचनेत बारकावे दर्शवता येतात.

loading image
go to top