esakal | Pune : सायबर भामट्याकडून महिलेची ११ लाखांची फसवणूक
sakal

बोलून बातमी शोधा

cyber crime

Pune : सायबर भामट्याकडून महिलेची ११ लाखांची फसवणूक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : मोबाईलमधील सीमकार्डची माहिती अद्ययावत करण्याचा बहाणा करून सायबर गुन्हेगारांनी महिलेच्या बॅंक खात्यातील तब्बल अकरा लाख रुपयांची रक्कम काढून घेतली. याप्रकरणी अनोळखी व्यक्तीविरुद्ध वानवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत वानवडी येथे राहणाऱ्या 57 वर्षीय महिलेने वानवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिपक लगड यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या खासगी कंपनीमध्ये नोकरी करतात. त्या त्यांच्या आईसह वानवडी परिसरात राहतात. 4 फेब्रुवारी 2021 या दिवशी फिर्यादीच्या आईच्या मोबाईलवर एका अनोळखी व्यक्तीने भारत संचार निगम लिमीटेडचे (बीएसएनएल) बोधचिन्ह असलेला एक मेसेज पाठविला. त्यानंतर त्याने त्यांच्या मोबाईलवर संपर्क केला. आपण कोथरुड येथील निवृत्त अधिकारी वसाहतीमधून बोलत आहोत. तुमच्या मोबाईल सीमकार्डची मुदत संपली आहे, 24 तासानंतर सीमकार्ड बंद पडेल, सीमकार्ड सुरू ठेवण्यासाठी आम्ही पाठविलेल्या मोबाईल क्रमांकावर फोन करा, अशी महिलेस बतावणी केली.

हेही वाचा: पुणे शहरात डुक्करांचा सुळसुळाट

फिर्यादी व त्यांच्या आईने त्याच्यावर विश्‍वास ठेवला. त्यानंतर अनोळखी व्यक्तींनी त्यांच्या डेबीट व क्रेडीट कार्डमधील गोपनीय माहिती त्यांच्याकडून घेतली. महिलेचा मोबाईल क्रमांक त्यांच्या बॅंक खात्याला जोडलेला होता. त्यानंतर गोपनीय माहिती, मोबाईल क्रमांक याचा वापर करून संबंधीत व्यक्तींनी फिर्यादीच्या बॅंक खात्यातील 75 हजार रुपये आणि त्यांच्या आईच्या बॅंक खात्यातील 10 लाख 10 हजार असे एकूण दहा लाख 85 हजार रुपयांची रक्कम ऑनलाईन माध्यमाद्वारे चोरली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर फिर्यादीने तत्काळ पोलिसांकडे फिर्याद दाखल केली.

हेही वाचा: बारामती-इंदापूर तालुक्यातील पिकविमा धारकांना 25 टक्के आगाऊ रक्कम

सायबर गुन्हेगारांकडून महिला, वृद्ध नागरीकांना सीमकार्ड, पेटीएमची माहिती अद्ययावत करणे, केवायसी भरणे या पद्धतीने मेसेज, फोन करून त्यांना आपल्या जाळ्यात ओढळले, जाते. त्यांचा विश्‍वास संपादन करून त्यांच्या बॅंक खात्यातील पैसे चोरले जातात. त्यामुळे नागरीकांनी अशा पद्धतीने कोणालाही आपल्या बॅंक खात्यासंबंधीची गोपनीय माहिती देऊ नये, असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.

loading image
go to top