Ramesh Chennithala : विदर्भ-मराठवाड्यातील पूरग्रस्तांच्या मदतीपेक्षा फडणवीस व मोदी यांच्यात गडचिरोलीतील खनिकर्म माफियावरच चर्चा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली, त्या भेटीत पूरग्रस्तांना मदत करण्यापेक्षा गडचिरोलीतील खनिकर्म माफियावरच चर्चा झाली.
पुणे - 'विदर्भ-मराठवाड्याला अतिवृष्टीचा मोठा फटका बसला आहे, पुरामध्ये दीडशे जणांचा मृत्यू झाला आहे. आम्ही मदतीसाठी पोहोचलो आहोत. मात्र अजूनही राज्य सरकारने शेतकऱ्यांना पुरेशी मदत जाहीर केलेली नाही.